मुंढावरे-वाडिवळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारती नवनाथ थोरवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या उपसरपंच दिपाली गरवड यांनी त्यांच्या पदाचा ठरवलेला कार्यकाळ पुर्ण केल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. यावेळी भारती थोरवे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ( Bharti Thorve Elected Unopposed Deputy Sarpanch Of Mundhavare Wadiwale Group Gram Panchayat )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
निवडणूक निर्णय अधिकारी आणि सचिव म्हणून ग्रामसेवक परमेश्वर गोमसाळे यांनी यावेळी काम पाहिले. तर, निवडणूक प्रक्रियेच्या सभेचे अध्यक्ष म्हणून सरपंच नवनाथ हेलम यांनी काम पाहिले. ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य गोरख बांगर, कैलास वाघमारे, सागर रणपिसे, धोडीबा हेलम, सदस्या चंद्रभागा कदम, पल्लवी थोरात, राणी जाधव, दिपाली गरवड आदी यावेळी उपस्थित होते. सर्वांनी भारती थोरवे यांच्या निवडीनंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
अधिक वाचा –
– श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर अँड ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
– रूपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट करणाऱ्या व्यक्तीला अटक !