राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट करणाऱ्या जयेश पडवळे या आरोपीला पोलिसांनी आज भादंवि कलम 354(A)(1)(4), 500 , 509 आणि IT act 67 नुसार अटक केली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रूपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट आणि शिवीगाळ करणाऱ्या जयेश पडवळे, निशांत नाईक, संतोष एकनाथ चाकणकर, सुनील खळदकर, शैलेश भांबीड, अक्षय पांडे, ज्ञानेश्वर झोळेकर, अनिल सूर्यवंशी, पुष्पेंद्र बने या 9 जणांविरुद्ध जून महिन्यामध्ये मुंबईतील बांद्रा येथील खेरवाडी पोलीस ठाण्यामध्ये वरील सर्व कलमांनुसार गुन्हा दाखल झाला होता आणि पोलीस अधिक तपास करत होते. यामधील जयेश पडवळे या आरोपीला शुक्रवारी (16 डिसेंबर) पालघर येथून अटक करण्यात आली आहे, तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपींवर देखील अटकेची कार्यवाही चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ( Person Arested For Obscene Comments on Maharashtra State Commission for Women Chairperson Rupali Chakankar )
अधिक वाचा –
– माऊ गावाजवळ दुचाकीचा अपघात, वीटभट्टीवरील कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर कोसळलं दुःखाचं आभाळ
– सरपंचपदाच्या उमेदवार महिलेच्या पतीचा प्रचारादरम्यान मृत्यू; गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र होतंय कौतूक