व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सरपंचपदाच्या उमेदवार महिलेच्या पतीचा प्रचारादरम्यान मृत्यू; गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र होतंय कौतूक

मुरुड ग्रामपंचायत ही लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 16, 2022
in महाराष्ट्र, मावळकट्टा
Gram-Panchayat-Election 2022

Photo : Gram Panchayat Election


महाराष्ट्रातील एकूण 35 जिल्ह्यांतील विविध ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा महासंग्राम सध्या सुरू आहे. अशात काल (गुरुवार, 15 डिसेंबर) रोजी लातूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली होती.

Novel NIBR Ads

लातूर जिल्ह्यातील मुरुड ग्रामपंचायतीचा प्रचार जोरात सुरु होता. अशात प्रचारसभेदरम्यान भाषण केल्यानंतर व्यासपीठावर बसलेल्या अमर पुंडलिक नाडे यांचे हार्ट अटॅकने निधन झाले. अमर नाडे यांच्या पत्नी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या उमेदवार आहेत. या घटनेमुळे ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसला, तसेच गावातील वातावरणही बदलून गेले. ( Man Dies Due To Heart Attack After Giving Speech In Election Rally Latur Murud Gram Panchayat Villagers Take Big Decision )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

त्यानंतर आता एक अतिशय महत्वाची माहिती समोर येत आहे. या गावातील चौका-चौकात लागलेले सगळे बॅनर काढून टाकण्यात आले आहेत. मृत अमर नाडे यांची पत्नी ह्या सरपंच पदाच्या उमेदवार असून त्यांना आता विरोधी पॅनलने देखील जाहीर पाठींबा दिला आहे. मुरुड ग्रामस्थांनी आणि स्थानिक नेत्यांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता कोणीही प्रचारासाठी बाहेर पडताना दिसत नाही.

मुरुड ग्रामपंचायत ही लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक आहे. मुरुडमध्ये भरणारा गुराचा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. अतिशय सशक्त आणि आर्थिकरित्या मजबूत असलेली 17 सदस्यांची ही ग्रामपंचायत कायमच चर्चेत असते.

Novel NIBR Ads

ग्रामपंचायत निवडणूक ही स्थानिक राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेची असते. अशावेळी विरोधी पॅनलच्या उमेदवाराच्या पतीचे निधन झाल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि गावातील सर्व बॅनर आणि प्रचार बंद केला, ही गोष्ट कौतुकास्पद आहे.

अधिक वाचा –

– वरसोली, देवळे, कुनेनामा गावात पोलिसांकडून रूट मार्च; भयमुक्त होऊन मतदान करण्याचे मतदारांना आवाहन
– इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आवेदनपत्र भरण्यासाठी डिसेंबरच्या ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ


dainik maval jahirat

Previous Post

वरसोली, देवळे, कुनेनामा गावात पोलिसांकडून रूट मार्च; भयमुक्त होऊन मतदान करण्याचे मतदारांना आवाहन

Next Post

माऊ गावाजवळ दुचाकीचा अपघात, वीटभट्टीवरील कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर कोसळलं दुःखाचं आभाळ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident

माऊ गावाजवळ दुचाकीचा अपघात, वीटभट्टीवरील कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर कोसळलं दुःखाचं आभाळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.