मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे पारडे आता जड होताना दिसत आहे. संजोग वाघेरे यांना ‘भीमशक्ती शिवशक्ती’ संघटनेने पाठींबा जाहीर केला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अर्थात महाविकास आघाडी कडून संजोग वाघेरे पाटील हे अधिकृत उमेदवार आहेत. मविआचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे यांना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित ‘भीमशक्ती शिवशक्ती’ संघटनेने आपला पाठींबा जाहीर केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भीमशक्ती शिवशक्ती संघटनेकडून याबाबत पाठिंब्याचे पत्र संजोग वाघेरे यांना देण्यात आले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात दलित, बहुजन, अल्पसंख्याक जाती-जमाती समूहातील सजग मतदार समूह आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशा आशयाचे पत्र संजोग वाघेरे यांना देण्यात आले आहे. ( Bhimshakti Shivashakti organization announced support of Sanjog Waghere in Maval Lok Sabha )
‘भीमशक्ती शिवशक्ती’ संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सतिश देशमुख, उपाध्यक्ष संग्राम भग, पिंपरी-चिंचवड शहरअध्यक्ष बाळासाहेब भालेराव, महिला शहराध्यक्ष तमन्ना शेख यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांना पूर्णपणे पाठींबा जाहीर केला. तसेच संघटनेने प्रसिद्धीपत्रक जारी केले असून वाघेरे पाटील यांचे ‘मशाल’ चिन्ह घराघरात पोहोचवणार असल्याचेही सांगितले आहे.
अधिक वाचा –
– ‘महाराष्ट्रात पहिली उमेदवारी मी संजोग वाघेरे पाटलांना दिली..त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून लोकसभेत पाठवा’ – उद्धव ठाकरे
– मावळमध्ये धडाडणार अजितदादांची तोफ ! श्रीरंग बारणेंसाठी आज घेणार 2 सभा, पहिली सभा कामशेतमध्ये तर दुसरी पिंपरीत
– संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे उतरणार मैदानात ! Maval Lok Sabha