वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कर्मवीर विद्यालय आढले बुद्रुक (ता. मावळ, जि. पुणे) नूतन इमारतीचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडियाच्या सीएसआर इनिशिएटिव्ह राऊंड टेबल इंडियाचे अध्यक्ष मनीष जाखोटिया हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणूव उपस्थित होते. राऊंड टेबल इंडियाच्या भरीव आर्थिक सहकार्यातून या इमारतीची उभारणी होत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव अॅड बी एस पाटील आण्णा यांनी त्याकाळात दुर्गम असणाऱ्या भागात या विद्यालयाची सुरवात करून भागातील मुलांच्या शिक्षणाची सोय केल्याबद्दल आभार व्यक्त केले. ( Bhoomi Poojan Ceremony Of New Building Of Karmaveer Vidyalaya At Adhale Budruk Maval )
भूमीपूजन प्रसंगी मा धैर्यशील पाटील, आढले बुद्रुकचे सरपंच विश्वास घोटकुले, राऊंड टेबलचे राष्ट्रीय प्रकल्प नियंत्रक मनोज भन्साळी, पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, इस्लामपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, पुणे जिल्हा वारकरी संप्रदाय समितीचे अध्यक्ष शरद घोटकुले, गोधामचे नितीन घोटकुले, विद्यमान उपसरपंच प्रताप घोटकुले, विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच जालिंदर मस्के, विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच नितीन ना घोटकुले, शालेय शिक्षण अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, ग्रामपंचायतीच्या सदस्या अश्विनी सपकाळ, संगीता सावंत, सुमन घोटकुले, सुनीता सावळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ, मुख्याध्यापक शिंदे सर, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– श्रीक्षेत्र देहूत ‘गाथा चिंतन’ सोहळ्याचे द्वितीय सत्र संपन्न, वारकरी दर्पणचे संपादक सचिनदादा पवार यांनी सांगितला अभंगांचा भावार्थ
– तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीत 30 जणांवर मोक्का, जानेवारीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत 110 गुन्हेगारांवर मोक्का