अल्पसंख्यांक नागरी क्षेत्र विकास विभाग अंतर्गत मंजूर निधीतून वडगाव नगरपंचायत हद्दीतील जामा मस्जिद येथील विविध विकासकामे होणार आहेत. ह्या विकासकामांचा शभारंभ शुक्रवारी (दि. 1 मार्च) माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि मुस्लिम बांधवांच्या हस्ते झाला. मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून, वडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नांने, तसेच माजी नगरसेवक राहुल ढोरे यांच्या पाठपुराव्याने हा निधी मंजूर झाला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
जामा मस्जिद येथील कब्रस्तानातील संरक्षक भिंत व स्वच्छतागृह बांधकामांसाठी सुमारे 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वडगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी आमदार शेळकेंचे आभार मानले. येत्या दोन दिवसांत या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात होणार आहे. विकासकामाच्या भूमिपूजनावेळी जामा मस्जिद चे पदाधिकारी इन्नुस मोमीन, रशीद शेख, अब्दुल शेख, अहमद सय्यद, आयुब पिंजारी, रा काॅ अल्पसंख्याक अध्यक्ष मजहर सय्यद, जावेद तांबोळी, ताहिर मोमीन आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Bhoomi Poojan of various development works at Jama Masjid in Vadgaon Maval City )
अधिक वाचा –
– ‘गाफील राहू नका, उद्याच निवडणूक असल्याचे समजून कामाला लागा’ – खासदार श्रीरंग बारणे यांचे आवाहन
– सुर्य तापला… कडक उन्हामुळे मावळ तालुक्यातील धरणांतील पाणीसाठ्यात घट, पाहा कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा?
– मावळात राजकीय भूकंप! राष्ट्रवादीतील दादा गटाला खिंडार, एक दोन नव्हे तब्बल सव्वाशे पदाधिकाऱ्यांचा राजीनामा । Lonavala News