व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘गाफील राहू नका, उद्याच निवडणूक असल्याचे समजून कामाला लागा’ – खासदार श्रीरंग बारणे यांचे आवाहन

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा काळेवाडीत पदाधिकारी मेळावा झाला. पक्ष संघटना, निवडणूक रणनिती, काम करण्याबाबत खासदार बारणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 1, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Maval-Lok-Sabha-Shivsena

Photo Courtesy : Team Dainik Maval


‘आपल्या कामाचा आलेख मोठा आहे. डोळ्यावरील पट्टी उघडली तरच विरोधकांना आपली कामे दिसतील. त्यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करावे. कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत. गाफील राहू नका, उद्याच निवडणूक आहे असे गृहित धरुन कामाला लागा’, असे आवाहन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा काळेवाडीत पदाधिकारी मेळावा झाला. पक्ष संघटना, निवडणूक रणनिती, काम करण्याबाबत खासदार बारणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. खासदार बारणे म्हणाले, पिंपरीत पासपोर्ट कार्यालय सुरु केली. मेट्रो निगडीपर्यंत नेली. पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणातील गाळ स्वखर्चाने काढला. रेल्वेच्या तिस-या, चौथ्या ट्रॅकसाठी पाठपुरावा केला. त्याचा 50 टक्के खर्च राज्य सरकारने उचलला आहे. त्यामुळे कामाला गती मिळाली आहे. (Maval Lok Sabha Shiv Sena officials meeting Guidance of MP Shrirang Barane)

पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून मतदारसंघात रस्ते केले. पंतप्रधान आवास योजनेतून 2 हजार 147 कोटी रुपये आणले. दीन दयाळ योजनेअंतर्गत द्रारिद्र्य रेषेखोलील लोकांना लाभ दिला. मावळातील दुर्गम भागात, आदिवासी पाड्यांवर लाईट नेली. रस्ते केले. इलिफंटा लेणीवर पाण्याखालून लाईट पोहोचविली. मुद्रा योजनेअंतर्गत 1200 कोटी रुपयांचा लाभ नागरिकांना मिळवून दिला. पनवेल ते उरण रेल्वे चालू केली. पनवेल ते कर्जत रेल्वेचे काम चालू आहे. लोणावळा, देहूरोड, चिंचवड, तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनचा कायापालाट होत आहे.आई एकविरा देवी परिसराचा विकास होत आहे. माथेरानमध्ये टाय ट्रेन सुरु केली. जिझिया शास्तीकर रद्द केला. 565 कोटी माफ केले. येत्या काही दिवसातच साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न मार्गी लागेल. नगरविकास, जिल्हा नियोजन, खासदार निधीतून रस्त्यांची कामे केली. कामांची मोठी जंत्री आहे. ही कामे लोकांपर्यंत पोहचावावित. शासन आपल्या दारी योजनेतून लोकांना जागेवर कागदपत्रे उपलब्ध करुन दिली. शहरासाठी मुळशी धरणातून पाणी आरक्षित केले जाणार आहे.

भाजपा-आरपीआयसह महायुतीतील मित्र पक्षांच्या पाठिंब्याने दोनवेळा मी संसदेत गेलो. आता 2024 ची निवडणुकही शिवसेनकडून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा निर्धार केला. शहराच्या विकासावर त्यांचे लक्ष आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचेही मोठे योगदान, सहकार्य मिळत आहे. या सर्वांच्या पाठिंब्यावर आगामी निवडणूक लढणार आणि जिंकणार असा निर्धार खासदार बारणे यांनी केला. मतदारांचे लक्ष विचलित करण्यासाठी विरोधक काहीही आरोप करु शकतात. त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहनही त्यांनी केले. एकंदरीत खासदार बारणे यांचे भाषण कार्यकर्त्यांना उर्जा देणारे झाले.

अधिक वाचा –
– आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात, पवनानगर केंद्रावर दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण । SSC Exam 2024
– पवनानगर येथील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने सर्वजण थक्क
– राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाची मोठी कारवाई! अवैध दारूसह सुमारे 2 कोटी 82 लाखांचा मुद्देमाल जप्त । Pune News


Previous Post

सुर्य तापला… कडक उन्हामुळे मावळ तालुक्यातील धरणांतील पाणीसाठ्यात घट, पाहा कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

Next Post

IPS सत्यसाई कार्तिक यांची आणखी एक दमदार कामगिरी; पाच वर्ष जुन्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
lonavala-police

IPS सत्यसाई कार्तिक यांची आणखी एक दमदार कामगिरी; पाच वर्ष जुन्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Meritorious Teacher Award to 48 teachers from 24 centers in Maval taluka

Maval : मावळ तालुक्यातील २४ केंद्रातील ४८ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

February 16, 2026
PM-Narendra-Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पांची भेट ; १८,५०९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

February 16, 2026
Lakhs of rupees were extorted from candidates in name of EVM machine hacking MLA Sunil Shelke serious allegations

ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रूपये उकळले ; आमदार सुनील शेळके यांचे विरोधकांवर गंभीर आरोप

February 16, 2026
Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.