व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात, पवनानगर केंद्रावर दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण । SSC Exam 2024

राज्यभरात इयत्ता दहावीच्या परीक्षेला (SSC Board Exams 2024) आजपासुन (दि. 1 मार्च) सुरवात होणार असून पवनानगर (ता. मावळ) केंद्रातही दहावीच्या परीक्षेची तयारी पुर्ण झाली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 1, 2024
in लोकल, ग्रामीण
SSC-Board-Exam-2024

Photo Courtesy : Team Dainik Maval


राज्यभरात इयत्ता दहावीच्या परीक्षेला (SSC Board Exams 2024) आजपासुन (दि. 1 मार्च) सुरवात होणार असून पवनानगर (ता. मावळ) केंद्रातही दहावीच्या परीक्षेची तयारी पुर्ण झाली असल्याची माहीती केंद्रसंचालक व प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी दिली. पवनमावळ परिसरातील पवना विद्या मंदिर, पवनानगर केंद्रामध्ये पवना विद्या मंदिर, वारु-कोथुर्णे विद्यालय कोथुर्णे, भैरवनाथ विद्यालय बौर, संत तुकाराम विद्यालय शिवणे, संत ज्ञानेश्वर विद्यालय दिवड, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय शिवली, माध्यमिक विद्यालय करुंज, ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय जवण-अजिवली या शाळेतील विद्यार्थी या शाळांमधील एकूण 417 विध्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. ( Maharashtra SSC Board Exam 2024 10th Board exam )

यामध्ये परीक्षा ‘कॉपी मुक्त अभियाना ‘साठी व परिक्षा शांततेत पार पाडण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असुन दक्षता समितीचे सदस्यही मदत करत आहेत. तसेच केंद्र कॉफी मुक्त होण्यासाठी संपूर्ण ब्लॉक मध्ये सी. सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यावेळी नूतन महाराष्ट्र प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी केंद्रातील सर्व विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

ही परीक्षा व्यवस्थीत पार पडावी व विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी परीक्षा केंद्रसंचालक भाऊसाहेब आगळमे, उपकेंद्र संचालक अर्चना शेडगे प्रमुख व परीक्षा विभाग प्रमुख भारत काळे, सहाय्यक गणेश ठोंबरे विशेष प्रयत्न करत आहेत. यावेळी बोलताना भाऊसाहेब आगळमे म्हणाले की, केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सी.सी.टी.व्ही. बसवण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना भयमूक्त वातावरण सामोरे जातील.

राज्यात 9 विभाग मंडळात परीक्षा –
राज्यात इयत्ता दहावीच्‍या परीक्षेला 1 मार्च म्हणजेच आजपासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा एकूण नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहे. तसेच या परीक्षेसाठी एकूण 16,09,445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून एकूण 5 हजार 86 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती पुणे बोर्डाकडून देण्यात आली आहे.

अधिक वाचा –
– पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या 9 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना 21 हजार कोटी वितरित । PM Kisan Yojana
– स्वीडनहून थेट मावळात..! शिळींब गावात आले परदेशी पाहुणे, गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात केले स्वागत । Maval News
– मावळमधील डोंगरी भागातील शेतकऱ्यांना शेळीपालन विषयी प्रशिक्षण; शिबिरार्थी 554 शेतकऱ्यांना शेती अवजारांचे वाटप । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

पवनानगर येथील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने सर्वजण थक्क

Next Post

मावळात राजकीय भूकंप! राष्ट्रवादीतील दादा गटाला खिंडार, एक दोन नव्हे तब्बल सव्वाशे पदाधिकाऱ्यांचा राजीनामा । Lonavala News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ncp-ajit-pawar-lonavala-maval

मावळात राजकीय भूकंप! राष्ट्रवादीतील दादा गटाला खिंडार, एक दोन नव्हे तब्बल सव्वाशे पदाधिकाऱ्यांचा राजीनामा । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.