व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील डोंगरी भागातील शेतकऱ्यांना शेळीपालन विषयी प्रशिक्षण; शिबिरार्थी 554 शेतकऱ्यांना शेती अवजारांचे वाटप । Maval News

मावळ तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील शेतकऱ्यांसाठी गेस्टॅम्प कंपनी आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेळीपालन या विषयी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 29, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
farmers-maval-taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील शेतकऱ्यांसाठी गेस्टॅम्प कंपनी आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेळीपालन या विषयी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होते. यात वडेश्वर ग्रामपंचायत मधील डोंगरवाडी, सटवाईवाडी आणि शिंदेवाडी तसेच इंगळून ग्रामपंचायत अंतर्गत सुपेवाडी, कुणे याठिकाणच्या शेतकऱ्यांचा समावेश होता. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

प्रशिक्षण शिबिराच्या प्रास्ताविकात होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनचे समुदाय विकास सम्नवयक ऋषीकेश डिंबळे यांनी, ‘या भागामध्ये शेतीपूरक व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना पुढे अनुदान देऊन व्यवसायात मदत केली जाईल. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी संस्था मोठ्या प्रमाणात काम करत आहे. संस्थेच्या संस्थापिका डॉ. केरोलीन या भागाच्या विकासाठी सामाजिक उत्तर दायित्त्व निधी मिळवून या भागाचा विकास करण्यावर भर देत आहेत,’ असे सांगितले. ( training camp on goat rearing for hilly areas farmers in maval taluka )

प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षक सतीश राहनेर यांनी शेळी पालन या विषयावर शेतकऱ्यांना सखोल मागर्शन केले. प्रशिक्षण सत्रासाठी प्रकल्प प्रमुख डॉ. हेलगा, सीएसआर हेड अंकिता कोठारी, समुदाय विकास व्यवस्थापक शकील शेख, सह व्यवस्थापक परम आंनद, समुदाय समनव्यक ऋषिकेश डिंबळे, सामाजिक कार्यकर्ते लहू मोरमारे, सरपंच छाया हेमाडे, सरपंच सुदाम सुपे, रुपाली सुपे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

प्रशिक्षणासाठी उपस्थित 554 शेतकऱ्यांना यावेळी गेस्टॅम्प कंपनी यांच्या सहकार्याने आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्यामार्फत शेती अवजारे कुदळ, फावडे, हातपंजा, खुरपे, विळा आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांच्या सरपंच महोदय यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

अधिक वाचा –
– सुदुंबरेतील सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी येथे मोफत नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर
– भाजपाचं ठरलंय… मावळ लोकसभा लढणार? कर्जतमध्ये पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक, प्रचाराचे रणशिंग फुंकले । Maval Lok Sabha Election 2024
– कल्हाट येथे समाज मंदिराचे भूमिपूजन, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध । MLA Sunil Shelke


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील महिलांना व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन; इनर व्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम

Next Post

स्वीडनहून थेट मावळात..! शिळींब गावात आले परदेशी पाहुणे, गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात केले स्वागत । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shilimb-village-maval

स्वीडनहून थेट मावळात..! शिळींब गावात आले परदेशी पाहुणे, गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात केले स्वागत । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.