आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वडगाव शहरात नव्याने होत असलेल्या तलाठी कार्यालयाचे सोमवारी (दिनांक 8 मे) भूमिपूजन करण्यात आले. या तलाठी कार्यालयाच्या विकासकामासाठी सुनिल शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे 40 लक्ष 76 हजार एवढा निधी प्राप्त झाला आहे. त्या कामाची सोमवारी प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या भूमिपूजन प्रसंगी आमदार सुनिल शेळके, नगराध्यक्ष मयूर ढोरे, तलाठी साळुंके साहेब, रा. काँ. वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, नगरसेवक सुनील ढोरे, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे मंगेश खैरे, रा. काँ. अध्यक्ष प्रवीण ढोरे, माजी उपसरपंच अविनाश चव्हाण, विशाल वहिले, अतुल राऊत, मजहर सय्यद आदी जण उपस्थित होते. ( Bhoomi Pujan by MLA Sunil Shelke of Talathi office which is newly held in Vadgaon city )
अधिक वाचा –
– मावळमधील बेलज येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन
– पवना धरणग्रस्तांचे पाणी बंद आंदोलन; ‘ठोस निर्णय घेतल्याशिवाय माघार नाही’, आंदोलकांचा पवित्रा