Dainik Maval News : केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत पीएम-जनमन व प्रधानमंत्री घरकुल योजना अंतर्गत कार्ला ग्रामपंचायतीकडून एकूण 14 भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाली आहेत. तसेच लाभार्थींना घरांसाठी गावातील गायरानातील जागा उपलब्ध करून देण्यात आली असून याठिकाणी बांधण्यात येणाऱ्या घरकुलांचे भूमिपूजन गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सहायक गट विकास अधिकारी सेवक थोरात, विस्तार अधिकारी शुभांगी भूमकर, सरपंच दिपाली हुलावळे, उपसरपंच अभिषेक जाधव, ग्रामपंचायत सदस्य किरण हुलावळे, सचिन हुलावळे, सनी हुलावळे, सदस्या भारती मोरे, वत्सला हुलावळे, सोनाली मोरे, उज्वला गायकवाड, लाभार्थी नागरिक उपस्थित होते.
कार्ला गावातील आदिवासी व भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेली, परंतु घरांसाठी जागा उपलब्ध नव्हती. अखेर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या सहकार्याने आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गायरानामधील दहा गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली. आता या जागेमध्ये ही घरकुले होणार आहेत. आपल्याला हक्काचे घर मिळणार, या गोष्टीचा आनंद यावेळी सर्व लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
अधिक वाचा –
– Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक ! दहशतवादी तळांवर हल्ले, पहलगाम हल्ल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर
– पुणे जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती । Pune News
– पर्यटकांच्या सोयीसाठी लोणावळा शहरात वाहनतळ विकसित करावेत – खासदार श्रीरंग बारणे । MP Shrirang Barne