Dainik Maval News : मावळ लोकसभेचे खासदार संसदरत्न श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायती मध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा धडाका मावळ तालुक्यात सुरू आहे.
यामध्ये विशेष अंतर्गत रस्ते, सभामंडप, शाळा इमारत, स्मशानभूमी मंदिर सुशोभीकरण करणे आशा विविध कामांना खासदार श्रीरंग बारणे यांच्या ५० कोटी पेक्षा अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती तालुकाप्रमुख राजु खांडभोर यांनी दिली आहे. नुकताच घोणशेत ग्रामपंचायत हद्दीतील वाउंंड येथील 20 लक्ष निधीतील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजु खांडभोर, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, घोणशेत ग्रामपंचायत सरपंच गजानन खरमारे,उपसरपंच मच्छिंद्र कचरे, उद्योजक सोमनाथ राक्षे, गुणवंत कामगार रमेश जाचक, शालेय समिती मा.अध्यक्ष सोमनाथ चोरघे, संतोष राक्षे,कुशाबा विरकर,मयुर मोकाशी, दासु यादव, देवराम मोकाशी,चिधु राक्षे,राजु हेमाडे यासह महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पावसाचा जोर वाढला, पुणे जिल्हा घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस, मावळात रात्रीपासून जोरदार पाऊस
– मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली, पोलिसांचे सपशेल दूर्लक्ष । Maval News
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहने सुसाट !! ‘आयटीएमएस’ प्रणालीद्वारे तब्बल साडेचारशे कोटींचे ई-चलन जारी