देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील कोटेश्वरवाडी, शेलारवाडी, झेंडेमळा, काळोखे मळा, किन्हई,चिंचोली, सिद्धिविनायक नगरी येथील सुमारे 12 कोटींच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी (दि. 27 ऑक्टो.) संपन्न झाला. आमदार सुनिल शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासकामांचे भूमिपूजन झाले. यावेळी माजी नगरसेवक, पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, परिसरातील माता-भगिनी, युवा सहकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांच्या मागणीनुसार सार्वजनिक कामांना प्राधान्य दिले आहे. येथील नागरिकांसाठी मुलभुत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. सुमारे बारा कोटी तीस लक्ष निधीतून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण करणे, सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे, बंदिस्त गटार करणे, सभामंडप बांधणे, विरंगुळा केंद्र बांधणे, शाळेच्या वर्ग खोल्या बांधणे, वस्तीतील शौचालय बांधणे, दफनभूमी व समाज मंदिराला संरक्षक भिंत बांधणे, स्ट्रीट लाईट बसविणे इ. कामे होणार आहेत. ( bhoomi pujan of various development works in dehu road cantonment board limits presence of MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य भजन स्पर्धा; पहिल्यांदाच पुरुषांसह महिलांचेही संघ सहभागी
– मावळ तालुक्यातील चंदनवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप
– गहूंजे-साळुंब्रे, शिवणे-सडवली, थुगाव-बऊर, कडधे-आर्डव ह्या पुलांची कामे 30 जानेवारीपर्यंत पुर्ण करण्याचे आदेश