वाकसई ग्रुप ग्रामपंचायत मधील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार सुनिल शेळके आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 1) संपन्न झाला. वाकसईसह, देवघर, जेवरेवाडी, करंडोली या गावांचा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत समावेश आहे. या सर्व गावांमध्ये अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, तसेच मुख्य रस्ता कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण करणे, सभामंडप बांधणे, तलाठी कार्यालय इमारत बांधणे, व्यायाम शाळा साहित्य उपलब्ध करणे अशा विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध केला आहे. पुढील काळात देखील नागरिकांच्या मागणीनुसार आवश्यक कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
सदर कार्यक्रमाला आमदार सुनिल शेळके यांच्यासह, कात्रज दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे, माजी पंचायत समिती सदस्य भरत येवले, ह.भ.प.तुषार महाराज दळवी, पीएमआरडीए सदस्या दिपाली हुलावळे, सरपंच सोनाली जगताप, उपसरपंच मारुती येवले, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम काशीकर, खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक, किरण हुलावळे, ज्ञानेश्वर निंबळे, शिवाजी असवले, रुपेश घोजगे, बाजीराव वाजे, शरद नखाते, अमोल भोईरकर, गणेश विनोदे, माणिक गाडे, प्रमोद दळवी, सुरेखा केदारी, मनीषा आंबेकर, विलासराव बडेकर नारायण पाळेकर तसेच आजी-माजी सरपंच,सदस्य, ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या.
अधिक वाचा –
– ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमाबद्दल मावळमधील कान्हे शाळेच्या 400 विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभेच्छापत्र
– शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी 8 हजार मेगावॅट वीजनिर्मिती निश्चित, देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
– टाकवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन । National Science Day