Dainik Maval News : शिरे येथील अंतर्गत रस्त्याचा भूमिपूजन समारंभ स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. रस्त्याच्या कामासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून दहा लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मरिमाता मंदिराकडे जाणारा रस्ता विकसित करावा अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांच्याकडे स्थानिक ग्रामस्थांनी केली असता त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार शेळके यांनी त्वरित दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला व कामास शुभारंभ देखील करण्यात आल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आहे.
या भूमिपूजन समारंभास श्रीकांत मोढवे, माजी उपसरपंच नवनाथ मोढवे, रामदास शेटे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ मोढवे, स्वाती शेटे, सुनिता पिलाणे, तानाजी पवार, जयेश शेटे, साहेबराव मोढवे, अरुण मोढवे, सुनिल मोढवे, तेजस मोढवे, सुभाष मोढवे, विलास भांगरे, शंकर मोढवे, नथु पवार, प्रतिक घोजगे, सुशांत बालगुडे व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– राज्यातील अंगणवाडी केंद्रांना सोलर सिस्टिम देणार, शिंदे सरकारचा निर्णय, 36 हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार
– कामशेतमधील मुस्लीम दफनभूमीस संरक्षण भिंत बांधण्यासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध । Kamshet News
– लोणावळा नगर परिषद हद्दीतील विविध विकासकामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन । Lonavala News