Dainik Maval News : कामशेत येथील मुस्लिम दफनभूमीस संरक्षक भिंत बांधण्यासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून होणाऱ्या विकासकामाचा शुभारंभ आमदार सुनिल शेळके आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या कामासाठी सुमारे 50 लक्ष निधी उपलब्ध झाला असून या निधीतून दफनभूमीची संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे, असे आमदार शेळके यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गजानन शिंदे, कामशेत-खडकाळा ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश गायकवाड, उपसरपंच दत्ता शिंदे, सदस्य परेश बरदाडे, निलेश दाभाडे, अभिजीत शिनगारे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष बाबा मुलाणी, अदिकभाई सिद्दिकी, गणीभाई शेख, फारुख शेख, अमिन शेख, अतिक अन्सारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत असणार एक ‘योजनादूत’, इथे करा अर्ज
– वडगाव मावळ येथील नूतन प्रशासकीय इमारतीच्या नामकरणाबाबत आमदार सुनिल शेळके यांना निवेदन । Vadgaon Maval
– कुंडमळा येथे वाहून गेलेल्या ‘त्या’ तरुणीचा मृतदेह सापडला । Talegaon Dabhade