Dainik Maval News : इंदोरी जवळील कुंडमळा येथे गुरुवारी (दि. 5 सप्टेंबर) रोजी एक तरुण आणि तरुणी पाण्यात वाहून गेले होते. त्यातील तरुणाचा मृतदेह गुरुवारी दुपारी सापडला. मात्र तरुणी बेपत्ता होती. या तरुणीच्या शोधासाठी शुक्रवारी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. अखेर मुलीचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला आहे. श्रेया सुरेश गावडे (वय 17) आणि रोहन ज्ञानेश्वर ढोंबरे (वय 22) अशी पाण्यात वाहून बुडून मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
श्रेया आणि रोहन हे कुंडमळा येथे फिरण्यासाठी आले होते. सेल्फी घेत असताना श्रेया पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी रोहन याने पाण्यात उडी घेतली. मात्र तो तिला वाचवू शकला नाही. दोघेही पाण्यात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस दाखल झाले. गुरुवारी दुपारी रोहनचा मृतदेह काढण्यात पथकाला यश आले. त्यानंतर पुन्हा दोन दिवस शोध मोहीम राबवून तरुणीचा देखील मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले.
वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा याचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, भास्कर माळी, विनय सावंत, गणेश गायकवाड, राजेंद्र बांडगे, रवी कोळी, शुभम काकडे, सत्यम सावंत, अनिश गराडे, राजु सय्यद, कमल परदेशी तसेच तळेगाव दाभाडे अग्निशमन दलाच्या जवानांनी यासाठी परिश्रम घेतले.
अधिक वाचा –
– सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत ‘मावळरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न । Vadgaon Maval
– मावळ विधानसभेसाठी भाजपाने कसली कंबर, भाजपाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून गावभेटी सुरू
– महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट येथील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे । Lonavala News