Dainik Maval News : पक्षहित आणि पक्ष संघटना महत्त्वाची आहे. सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने केला पाहिजे. कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही.निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार, असे प्रतिपादन संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीचे सदस्य बापूसाहेब भेगडे यांनी केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सोमवारी (दि २) पत्रकारांशी तळेगाव दाभाडे येथे वार्तालाप साधताना ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबुराव वायकर, ज्येष्ठ नेते सुभाष जाधव,माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, संतोष मुऱ्हे, गणेश दिलीप काकडे, शहराध्यक्ष संतोष भेगडे, अशोक घारे, सुनील दाभाडे, कैलास गायकवाड,आशिष खांडगे, शिवाजी आसवले ,सचिन तारे, शरद कुटे, साईनाथ मांडेकर आदी उपस्थित होते. ( NCP Bapusaheb Bhegade Maval willing To Contest Maval Vidhan Sabha Elections )
बापूसाहेब भेगडे म्हणाले, सोशल मीडियावर चालू असलेले वार हे पक्षाच्या हिताचे नाही. ते कुठेतरी थांबले पाहिजेत. तालुकाध्यक्ष गणेश खांडगे आणि मी स्वतः आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावर हा विषय घातला आहे. त्यांनीही यामध्ये जातीने लक्ष घालणार असल्याचा शब्द दिला आहे.
भेगडे म्हणाले, प्रतिकूल परिस्थिती असतानाही तालुक्यात जवळपास ३०वर्षे पक्षाचे एकनिष्ठेने काम केले. पक्ष नेतृत्वाने आयात उमेदवार दिला. सर्व कार्यकर्त्यांनी एकनिष्ठेने काम करून सुनील शेळके यांना आमदार केले. जवळपास ९४ हजार मतांची तालुक्यातून आघाडी मिळाली. आता त्यांनी कार्यकर्त्यांना समान न्याय दिला पाहिजे.
आमदारकीसाठी इच्छुक –
आपण आमदारकीसाठी इच्छुक आहात का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता बापूसाहेब भेगडे म्हणाले, होय मी इच्छुक आहे. इच्छा व्यक्त करणे हा काही गुन्हा नाही. आमदारकीसाठी अजूनही एखादा कार्यकर्ता इच्छुक असू शकतो. तो त्याचा हक्क आहे. आमदारकी संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.
अधिक वाचा –
– मावळ विधानसभेसाठी भाजपाने कसली कंबर, भाजपाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून गावभेटी सुरू
– महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट येथील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे । Lonavala News
– ‘प्रसाद गोसावी’ अवयवदान करणारा पहिला पत्रकार ! मृत्यूशी झुंज अपयशी पण… अजूनही धडधडतंय हृदय ! Pune News