Dainik Maval News : वडगाव मावळ येथील नवीन प्रशासकीय इमारतीला मावळ तालुक्याचे प्रथम आमदार श्रीमंत सरसेनापती विरधवलराजे यशवंतराव दाभाडे यांचे नाव देण्याबाबत आणि तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या नूतन वास्तूमध्ये सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि ऐतिहासिक कलादालन उभे करण्यासंदर्भात सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आमदार सुनील शेळके यांना निवेदन देण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी ॲड विनय दाभाडे, विशाल दाभाडे, दीपक दाभाडे, आनंद दाभाडे, बाबाजी दाभाडे, मयूर दाभाडे, पुष्पक दाभाडे, अक्षय दाभाडे, सतीश दाभाडे, साहील दाभाडे आदी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. वडगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये श्रीमंत सरदार महादजी शिंदे ह्यांचे ही भव्य स्मारक किंवा स्वागत कमान उभारून त्यांच्या कार्याचा गौरव करावा अशीही मागणी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– दोन वर्षानंतर सरकारला आली जाग ! कोथुर्णे येथील पीडित मुलीच्या परिवारास 5 लाखांची मदत
– सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत ‘मावळरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न । Vadgaon Maval
– मावळ विधानसभेसाठी भाजपाने कसली कंबर, भाजपाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून गावभेटी सुरू