मावळ तालुक्यातील चांदखेड आणि परंदवडी येथील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी (18 डिसेंबर) रोजी पार पडला. ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत चांदखेड पाणी पुरवठा योजनेसाठी 3 कोटी 15 लाख आणि परंदवडीसाठी 3 कोटी 83 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ( Bhoomipujan Ceremony Of Water Supply Schemes In Chandkhed And Parandvadi Villages Under Jal Jeevan Mission )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संपूर्ण मावळ तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर असून अनेक कामे अंतिम टप्प्यात आहेत. रविवारी (18 डिसेंबर) रोजी भूमिपूजन झालेल्या दोन्ही गावांसह वाडी-वस्तीवरील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचणार आहे. या योजनांची कामे देखील लगेचच सुरू करण्यात येणार आहेत.
मावळचे विद्यमान आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांच्या प्रयत्नांतून या दोन्ही गावात जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आहे. पाणी योजनेचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे आणि कामे दर्जेदार व्हावित, याकडे लक्ष देण्याचे आवाहन आमदार शेळकेंनी केले आहे. सदर भुमिपूजन सोहळ्यास पंचक्रोशीतील जेष्ठ मान्यवर, आजी-माजी सरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला-भगिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मोरवे गावात शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जनजागृती कार्यक्रम; हॅण्ड इन हॅण्ड संस्थेचा स्तुत्य उपक्रम
– लोकप्रतिनिधी असावा तर असा; अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन राष्ट्रवादीच्या महिला आमदार अधिवेशनाला हजर – व्हिडिओ
– जांभूळ येथील ‘परिक्रमा’ संस्थेचा द्वितीय वर्धापन उत्साहात साजरा, ‘वाटचाल विचारांची’ पुस्तकाचेही प्रकाशन