दिनांक 11 मार्च रोजी संकष्ट चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर पवना विद्या मंदिर माजी विद्यार्थी सभागृहाच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे संचलित, पवना शिक्षण संकुल, पवनानगर येथील शाळेसाठी माजी विद्यार्थी, आजी माजी शिक्षक व लोकवर्गणीतून पवना विद्या मंदिर माजी विद्यार्थी सभागृहाचे प्रत्यक्ष बांधकामास प्रारंभ झाला.
सदर कामाचे पूजन पवना विद्या मंदिर पवनानगर बॅच १९८६-८७ च्या वतीने मावळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व शिक्षक नेते राजेश राऊत, पवना फुल उत्पादक संघाचे संचालक उद्योजक वसंतराव कालेकर, तुंग माध्यमिक विद्यालयाचे जेष्ठ लिपिक संजय कालेकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष काशिनाथ निंबळे, पवना फुल उत्पादक संघाचे सचिव, ॲड भरत ठाकर प्रतिष्ठानचे संस्थापक व जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर ठाकर, काले येथील गायणाचार्य ह.भ.प अनंता महाराज कालेकर, पवना फुल उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष मुकुंदजी ठाकर, काले ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमित कुंभार, काले ग्रामपंचायतीचे सदस्य व युवा उद्योजक रमेश कालेकर, येळसे गावचे माजी उपसरपंच नवनाथ ठाकर, शिवसेनेचे नेते सुरेश गुप्ता, किशोर शिर्के, अतुल केंडे, शाळेचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका निला केसकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. ( Bhoomipujan of Pavana Vidya Mandir Alumni Hall was completed by alumni of the school Pavananagar Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी बोलताना मार्च १९८६- ८७ बॅचचे प्रतिनिधी राजेश राऊत म्हणाले की, सभागृहसाठी आवश्यक असणारे स्टील आमच्या बॅचच्या वतीने पुरवण्यात येईल त्यासाठी येणारा खर्च आमच्या बॅचच्या वतीने देण्यात येईल. तर मार्च १९९७ बॅचच्या वतीने १ लक्ष निधी उपलब्ध करून देणार असून त्यासाठी लवकरच बॅचचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती बॅचचे प्रतिनिधी व काले ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमित कुंभार यांनी आश्वासन दिले.
हेही वाचा – माजी विद्यार्थ्यांनी शब्द पाळला, पवना विद्या मंदिर शाळेतील सभागृह बांधणीसाठी मोठी मदतराशी शाळेकडे सुपूर्द
यावेळी बोलताना पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संजय मोहोळ म्हणाले की, मार्च १९९८ बॅचकडुन लवकरात लवकर जमा झालेल्या रकमेचा धनादेश शाळेचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल. यावेळी बोलताना पत्रकार ज्ञानेश्वर ठाकर म्हणाले की, आमच्या मार्च १९९२ च्या वतीने पहिली पन्नास हजार रुपयांची देणगी देऊन या सभागृहाची देणगीची शुभारंभ करण्यात आला आहे. पुढील कामासाठी देखील मदत करणार आहे.
हेही वाचा – पवनानगर इथे लायन्स क्लब ऑफ आकुर्डी यांच्यावतीने विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप आणि नेत्र तपासणी शिबिर
यावेळी कार्यकमाचे प्रास्ताविकात माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष काशिनाथ निंबळे सर म्हणाले की, सध्या शेतकरी, अदिवाशी, सर्व सामांन्यांची मुले मराठी शाळेत शिकत आहेत. त्यांना शासन कोणत्याही प्रकारची सुविधा देत नाहीत यासाठी माजी विद्यार्थी संघ सर्व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून शाळेसाठी विद्यार्थ्यांना कायमची सावली तयार व्हावी म्हणून सभागृहाची बांधणी करत आहेत. पूर्वी पत्राच्या शेडमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी ज्ञान ग्रहण केले शिक्षकांनीही प्रतिकूल परिस्थितीत भौतिक सुविधा नसताना देखील ज्ञानदानाचे काम केले. त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या जोरावर अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यामुळे मी शाळेसाठी काहीतरी देऊन खारीचा वाटा उचलावा, यासाठी अनेक विद्यार्थी मदत करत आहेत. त्यामुळे जूनपर्यंत सभागृहाचे पूर्ण होणार असून सर्वांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा – वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! माऊलींच्या आणि तुकोबांच्या पालखी मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार – गडकरी
या आव्हानाला प्रतिसाद देत शाळेचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे सर यांनी १ लाख ११ हजार १११ रूपयांचा धनादेश शाळेच्या सभागृहसाठी दिला. तसेच पवना फुल उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष व एक यशस्वी उद्योजक मुकुंद ठाकर यांनी ५० हजार रुपयांचा धनादेश संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे व पर्यवेक्षिका निला केसकर मॅडम यांच्याकडे सुपूर्द केला. तर शाळचे जेष्ठ अध्यापक व शाळचे माजी विद्यार्थी राजकुमार वरघडे यांनी १ लाख रुपये निधी, भारत काळे ५१ हजार रुपये निधी, गणेश ठोंबरे २१००० रुपये, ग्रंथपाल संतोष ठाकर ११००० रुपये, तर गणेश साठे सर ११००० रुपये निधी सभागृहसाठी उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले.
अधिक वाचा –
– शिवली गावात मोठ्या भक्तीभावात सुरु आहे अखंड हरिनाम सप्ताह, 14 मार्चला काल्याच्या कीर्तनाने होणार सांगता
– वडगाव इथे मावळ दुर्गा अभियान स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ; 50 हून अधिक मुलींचा सहभाग