मावळ तालुक्यातील पवनमावळ भागातील येळसे गावातील प्रस्तावित तलाठी कार्यालयाचा भुमिपूजन समारंभ नुकताच पार पडला. श्री संत तुकाराम साखर कारखान्याचे माजी संचालक ज्ञानेश्वर ठाकर आणि माजी सरपंच विजय ठाकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांचे आभार मानले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
स्वातंत्र्यापासून गावात तलाठी कार्यालय नसल्याने गावकामगार तलाठी यांना बसण्यासाठी कार्यालय नसल्याने गावातील शेतकऱ्यांचे कागदपत्राचे काम करण्यासाठी गैरसोय होत होती. शेतकऱ्यांना शेतीच्या कागदपत्रासाठी सहा ते सात किलोमीटर अंतरावर जावे लागत होते. महाराष्ट्र शासनाच्या निधीतून आणि आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याने एकुण सुमारे 20 लाख 38 हजारांचा निधी खर्च करून येळसे तलाठी कार्यालय बांधण्यात येणार आहे. ( Bhoomipujan Of Proposed Talathi Office Building In Yelase Village Completed Efforts By MLA Sunil Shelke )
भूमीपूजन प्रसंगी श्री संत तुकाराम कारखान्याचे माजी संचालक ज्ञानेश्वर ठाकर, माजी सरपंच विजय ठाकर, राष्ट्रवादी माजी महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, सदस्या विमल कालेकर, माजी उपसरपंच सुरेश कालेकर, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तोबा ठाकर, शिक्षक पतसंस्था संचालक नितीन वाघमारे, माऊली आढाव, राजेश राऊत, मावळ पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सचिन ठाकर, सुभाष कडू, रामदास कदम, अमित ठाकर, विक्रम ठाकर, राजु सुतार, दशरथ ठाकर, मारुती कालेकर, सुरेश कालेकर, भगवान शिंदे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थितीत होते.
अधिक वाचा –
– येळसे गावात वीज कोसळून जनावरांसाठी साठवलेला चारा जळून खाक, अवकाळी पावसामुळे पवनमावळातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
– वडगाव शहराला ‘सुरक्षेच्या तिसऱ्या डोळ्याची’ गरज; भाजपा महिला मोर्चाचे नगरपंचायत आणि पोलिस प्रशासनाला निवदेन