मावळ विधानसभा मतदारसंघातील मौजे कोथुर्णे गावातील एकूण 20 लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा शुक्रवारी, दि. 24 नोव्हेंबर रोजी पार पडला. तालुक्याचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, आर.पी.आय अध्यक्ष लक्ष्मणराव भालेराव, शांताराम कदम, पुणे जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष किरण राक्षे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, अंकुश सोनवणे, प्रमोद दळवी तसेच गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘मावळातील विकास कामांचा दर्जा राखा, अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करा’ – खासदार श्रीरंग बारणे
– महत्वाची बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर
– धक्कादायक! बनावट कागदपत्रे तयार करुन वनविभागाच्या जमिनीचा ‘सातबारा’, महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल