देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पुण्यामध्ये तीन दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान श्रीमती मुर्मू मावळ तालुक्यातील लोणावळा शहरानजिक कैवल्यधाम योग संस्थेला भेट देणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
1924 मध्ये स्वामी कुवल्यानंद यांनी जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त योग विषयक काही पुस्तकांचे विमोचन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. त्या अनुषंगाने संस्थेच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या पाश्वर्भूमीवर कैवल्यधाम संस्थेच्यावतीने बुधवारपासून (दि. 29 नोव्हेंबर) ‘योगाचा शालेय शिक्षणात समावेश’ या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ( President Draupadi Murmu Pune Tour Will Visit Lonavala )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 2 दिवस ट्राफिक ब्लॉक, ‘या’ गाड्या होणार रद्द, वाचा सविस्तर
– ‘मावळातील विकास कामांचा दर्जा राखा, अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करा’ – खासदार श्रीरंग बारणे
– महत्वाची बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर