पुणे रेल्वे विभागातील पुणे – लोCeवळा रेल्वे मार्गावरील शिवाजीनगर –खडकी स्टेशन दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासंदर्भात विविध तांत्रिक कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. या कारणाने शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर रात्रीपासून आणि रविवार दिनांक 26 नोव्हेंबर पर्यंत काही गाड्या रद्द होतील, काही पुनर्निधारित वेळेवर आणि काही विलंबाने चालतील, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रद्द करण्यात आलेल्या गाड्या –
1. शनिवार दिनांक 25 नोव्हेंबरला सुटणारी गाडी क्रमांक 12123 मुंबई – पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस आणि 11009 मुंबई- पुणे सिंहगड एक्सप्रेस रद्द राहील.
2. रविवार दिनांक 26 नोव्हेंबरला पुणे- तळेगाव -लोणावळा -पुणे दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन सर्व 46 लोकल सेवा गाड्या रद्द राहतील.
3. रविवार दिनांक 26 नोव्हेंबरला सुटणारी गाडी क्रमांक 12124 पुणे – मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस, 11010 पुणे -मुंबई सिंहगड एक्सप्रेस, 11007/11008 पुणे – मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस, 12127/12128 पुणे – मुंबई- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस तथा गाडी संख्या 12029/11030 मुंबई – कोल्हापूर- मुंबई कोयना एक्सप्रेस रद्द राहील.
पुनर्निर्धारित वेळेवर धावणाऱ्या गाड्या –
1. रविवार दिनांक 26 नोव्हेंबरला सुटणारी गाडी क्रमांक 12939 पुणे – जयपूर एक्सप्रेस पुणे येथून तिची निर्धारित प्रस्थान वेळ 17.30 वाजता ऐवजी दोन तास विलंबाने अर्थात 19.30 वाजता सुटेल.
2. रविवार दिनांक 26 नोव्हेंबरला सुटणारी गाडी क्रमांक 22106 पुणे – मुंबई एक्सप्रेस पुणे येथून तिची निर्धारित प्रस्थान वेळ 18.35 वाजता ऐवजी पंचवीस मिनिटे विलंबाने अर्थात 19.00 वाजता सुटेल.
3. रविवार दिनांक 26 नोव्हेंबरला सुटणारी गाडी क्रमांक 22150 पुणे – एर्नाकुलम एक्सप्रेस पुणे येथून निर्धारित प्रस्थान वेळ 18.45 वाजता ऐवजी एक तास विलंबाने अर्थात 19.45 वाजता सुटेल.
5. रविवार 26 नोव्हेंबरला दौंड येथून सुटणारी गाड़ी क्रमांक 22943 दौंड – इंदौर एक्सप्रेस दौंड वरून निर्धारित प्रस्थान वेळ 14.00 वाजता ऐवजी चार तास विलंबाने अर्थात 18.00 वाजता सुटेल.
5. शनिवार दिनांक 25 नोव्हेंबरला त्रिवेंद्रम येथून सुटणारी गाड़ी क्रमांक 16332 त्रिवेंद्रम – मुंबई एक्सप्रेस त्रिवेंद्रम येथून तिची निर्धारित प्रस्थान वेळ 04.25 वाजता ऐवजी दोन तास विलंबाने अर्थात अर्थात 06.25 वाजता सुटेल.
6. शनिवार दिनांक 25 नोव्हेंबरला ग्वालियर येथून सुटणारी गाडी क्रमांक 22194 ग्वालियर – दौंड एक्सप्रेस ग्वालियर येथून तिची निर्धारित प्रस्थान वेळ 17.15 वाजता ऐवजी दीड तास विलंबाने अर्थात 18.45 वाजता सुटेल.
उशिराने धावणाऱ्या गाड्या –
शनिवार दिनांक 25 नोव्हेंबरला बेंगलुरु येथून सुटणारी गाडी क्रमांक 11302 बेंगलुरु – मुंबई उद्यान एक्सप्रेस, बेंगलुरु येथून सुटणारी गाड़ी क्रमांक 16506 बेंगलुरु – गांधीधाम एक्सप्रेस आणि रविवार दिनांक 26 नोव्हेंबरला मुंबई येथून सुटणारी गाड़ी क्रमांक 11159 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- चेन्नई एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा एक्सप्रेस, मुंबई येथून सुटणारी 11019 छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई -भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस आणि मुंबई येथून सुटणारी 22732 छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई- हैदराबाद एक्सप्रेस पुणे विभागावर काही उशिराने धावतील.
अधिक वाचा –
– धक्कादायक! बनावट कागदपत्रे तयार करुन वनविभागाच्या जमिनीचा ‘सातबारा’, महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल
– मोठी कारवाई! अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेत साडेसहा लाखाचा पानमसाला जप्त
– महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मावळ तालुक्यातील ‘या’ दोन पैलवानांची चमकदार कामगिरी; होतोय कौतूकाचा वर्षाव