पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे निलख येथील योगेश दादासाहेब सावंत हे दिवाळीत तळेगाव एमआयडीसी रोड परिसरात आले होते, तेव्हा त्यांची अनेक महत्वाची कागदपत्रे तिथे हरवली होती. वडगाव मावळ येथील वहिले नगर भागात राहणाऱ्या शैलेश वहिले यांना ती कागदपत्रे सापडली होती. सदर कागदपत्रांत गाडीची आरसी बुक, अनेक क्रेडीट कार्ड, सौदी अरेबिया देशातील प्रवासाचे कागदपत्र अशा गोष्टींचा समावेश होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सदर महत्वाच्या गोष्टी मुळ मालकाला मिळायला हव्यात, असे वहिले यांना वाटले. त्यानंतर त्यांनी स्वतः पोलिसांची मदत घेऊन कागदपत्रांच्या मालकांचा संपर्क क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क करुन त्यांना वडगावातील खंडोबा मंदिर इथे बोलावले. तिथे मा. नगरसेवक मंगेश खैरे, शिवभक्त तुषार वहिले यांच्या उपस्थितीत शैलेश वहिले यांनी योगेश सावंत यांना त्यांची कागदपत्रे परत केली. योगेश सावंत हे यावेळी मदतीने भारावले होते, तसेच त्यांनी वहिले यांचे मनापासून आभार मानले आणि समाधान व्यक्ते केले. ( lost documents were returned to original owner Vadgaon Maval )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर
– धक्कादायक! बनावट कागदपत्रे तयार करुन वनविभागाच्या जमिनीचा ‘सातबारा’, महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल
– मोठी कारवाई! अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेत साडेसहा लाखाचा पानमसाला जप्त