Dainik Maval News : आंदर मावळ विभागातील माऊ पठार ते सटवाईवाडी रस्ता करणे, लहान पुलाचे बांधकाम करणे, डोंगरवाडी ते वडेश्वर धनगर पठार रस्ता सुधारणा करणे आणि सटवाईवाडीतील अंतर्गत रस्ते करणे अशा विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ रविवारी (दि.22) संपन्न झाला. आमदार सुनील शेळके आणि मान्यवरांच्या उपस्थितीत अनेक वर्षांपासूनचे हे प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सदर रस्त्यांच्या कामासाठी सुमारे 10 कोटी 20 लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून अनेक वर्षांपासून रखडलेल्या दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ होत असून लवकरच पठारावरील ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय दूर होणार आहे, असे मत आमदार सुनील शेळके यांनी यावेळी व्यक्त केले.
भूमिपूजन समारंभाला आमदार शेळकेंसह शांताराम लष्करी, नारायण ठाकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नंदकुमार खोत, रुपेश घोजगे, बाबुशेठ ओसवाल, संजीव असवले, देवाभाऊ गायकवाड, शिवराम शिंदे, स्वामी जगताप, निवृत्ती ठाकर, सरपंच छाया हेमाडे, शुभांगी दरेकर, ज्ञानेश्वर जगताप, वसुदेव लष्करी, सुरेखा शिंदे, रुपाली सुपे, हेमांगी खांडभोर, कुंदा मोरमारे, भरत लष्करी, हभप दत्तात्रय महाराज हेमाडे, अनंता हेमाडे, एकनाथ हेमाडे, लालाभाऊ हेमाडे, चंद्रकांत शिंदे, किरण हेमाडे, आंदर मावळातील आजी-माजी पदाधिकारी, सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘रात्री 11 वाजता मी भाजपात होतो आणि सकाळी 11 वाजता..’, आमदार शेळकेंनी सांगितला 2019च्या तिकीटाचा घटनाक्रम
– लोणावळ्यात दिसली सामान्यांची ताकद, आमदार शेळकेंसह सर्वपक्षीयांचा सहभाग, मुख्याधिकाऱ्यांना पाठवलं रजेवर । Lonavala Nagar Parishad
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke
