मावळ तालुक्यातील ओवळे गावात श्री म्हसोबा देवाचे मंदिर बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. मंदिराच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ आज रविवार (दिनांक 26 मार्च) रोजी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. ( Bhumi Poojan of Construction Shri Mhasoba Devasthan Temple In Ovale Village Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी मंदिराचे बांधकाम करण्यासाठी बंडुबाबा शिंदे आणि पोपटबाबा शिंदे यांनी जागा दिल्याबदद्ल त्यांचा देवस्थान मंडळाच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भुमिपूजन प्रसंगी ओवळे गावातील बंडुबाबा शिंदे (जागामालक), पोपटबाबा शिंदे (जागामालक), कृष्णाभाऊ साठे (मंडळ उपाध्यक्ष), अक्षय शिंदे, विठ्ठल साठे, साहिल साठे, देवाभाऊ शिंदे तसेच श्री म्हसोबा देवस्थान मित्र मंडळाचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्गच्या खेळाडूंना घवघवीत यश; तपस्या मतेला ‘स्ट्राँग वुमेन ऑफ महाराष्ट्र’ अवॉर्ड
– धक्कादायक! लोणावळ्यात तीन अल्पवयीन मुलांकडून शाळकरी मुलावर जीवघेणा हल्ला