शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. कोकणातील खेड इथे भव्य सभा घेतल्यानंतर आज (रविवार, 26 मार्च) रोजी उत्तर महाराष्ट्रातील नाशकातील मालेगाव इथे उद्धव ठाकरेंची भव्य सभा झाली.
या सभेत उद्धव यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच केंद्र सरकारवर देखील निशाना साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांनाही स्वांत्र्यवीर सावरकरांवरील विधानांवरुन ठणकावले. ‘सावरकर हे आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही,’ असे उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरुन जाहीरपणे सांगितले. ( We will not tolerate insult of freedom fighter Veer Savarkar said Uddhav Thackeray Warning to Rahul Gandhi in Malegaon Nashik rallly )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
#शिवगर्जना । पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा । एम. एस. जी. कॉलेज ग्राऊंड, मालेगाव, नाशिक – #LIVE
????आता जिंकेपर्यंत लढायचं !!#UddhavThackeray #निष्ठावंतांचामहासागर #आपलेसाहेब #कुटुंबप्रमुख
रविवार : २६ मार्च २०२३ https://t.co/s4cgv8chwZ
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 26, 2023
आम्ही सावरकरांचे भक्त – ठाकरे
काल राहुल गांधींची पत्रकार परिषद. हिडनबर्गने घोटाळे काढले पण त्याकडे लक्ष नाही. राहुल गांधींना जाहीर सांगतो सावरकर आमचे दैवत त्यांचा अपमान आम्हाला पटणार नाही. सावरकर काय होते हे आपण वाचू शकतो. अष्टभुजेसमोर शपथ घेणारे सावरकर. 15 व्या वर्षी ही सावरकरांची शपथ. सावरकरांनी जे केले ते कोणाचेही काम नाही 14 वर्ष छळ सोसला ते बलिदानच. म्हणून राहुल गांधींना सांगतोय आपण लोकशाही वाचवायला आलोय.आता जर वेळ चुकली तर मग पुढे कठीण आहे. पुन्हा जर हे तिथे बसले की मग लोकशाही संपली. ही लढाई मी मुख्यमंत्री होण्याची नाही लोकशाही वाचवण्याची आहे. भाजप मधील सावरकर भक्त आहात तर अंध भक्त होऊ नका., असे स्पष्टपणे ठणकावून उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत सांगितले.
अधिक वाचा –
– राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्गच्या खेळाडूंना घवघवीत यश; तपस्या मतेला ‘स्ट्राँग वुमेन ऑफ महाराष्ट्र’ अवॉर्ड
– स्तुत्य उपक्रम..! मुक्या प्राणीपक्षांची तहान भागवण्यासाठी फ्री वॉटर बाऊलचे वितरण