व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिंदे-फडणवीस सरकारवर टीका ते राहुल गांधींना ठणकावले, उद्धव ठाकरे यांचे मालेगाव सभेतील संपूर्ण भाषण, वाचा…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज (रविवार, 26 मार्च) उत्तर महाराष्ट्रात मालेगाव इथे जाहीर सभा घेतली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 26, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
Uddhav-Thackeray

File Pic : Uddhav Thackeray Dussehra Rally At Shivaji Park Dadar


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज (रविवार, 26 मार्च) उत्तर महाराष्ट्रात मालेगाव इथे जाहीर सभा घेतली. अतिशय अभूतपूर्व गर्दी झालेल्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी विविध घटकांवर परखड भाष्य केले. ( Full Speech of Shiv Sena Uddhav Thackeray In Malegaon Sabha Rally In Nashik )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वाचा उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण….

“मलाच समजत नाही या सभेचे काय वर्णन करायचे, आजची सभा अथांग आहे. आपल नाव चिन्ह चोरलय माझ्या हातात काही नाही तरी पण इतकी गर्दी ही पूर्वजांची आणि आई जगदंबेचे आशीर्वाद. मी मुख्यमंत्री होण्यासाठी नाही तर तुमच्यासाठी उभा आहे. अनेक वर्षांनी मालेगावात. कोरोना काळात मुंबई धारावी आणि मालेगावची परिस्थिती चिंताजनक. मालेगावच्या धर्मगुरूं सोबत चर्चा केली. तुम्ही सहकार्य केले म्हणून संकटावर मात करु शकलो. तुम्ही कुटुंबाचा सदस्य मानले.”

“गद्दारांनी नाव चिन्ह चोरले पण त्यांच्या नशिबात जिवाभावाच्या माणसाचे हे प्रेम नाही. अद्वय यांना धन्यवाद हा मर्द गडी आहे. तिथून इकडे आलाय. एकमेव संयुक्त महाराष्ट्राचा धागा आहे. गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी झाली. किती खोक्यांना झाली? मग तुमच्या कांद्याला भाव मिळायला हवे. अस्मानी आणि सुल्तानी दोन्ही संकटे आली. मविआ काळात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती महात्मा फुलेंच्या नावाने योजना. सत्ता आल्यावर पहिले काम केली कर्जमुक्ती. द्राक्ष बागायदारांना मदत करायची. पिकेल ते विकेल. शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे. आज शेतकऱ्यांना भेटलो दागिने गहाण ठेवले. परंतु नातीचे लग्न लांबले. कृष्णा डोंगरेंच्या रक्ताने पत्र लिहिले पण मुख्यमंत्री वाचून भाषण करतात पण पत्र वाचता येत नाही. ह्यावर आवाज उठवणार का? यांच्या गळ्यात दोरी बांधली आहे. दिवाळीत मुख्यमंत्री रमले शेतीत. हॅलिकाॅप्टरने शेतात गेले पण बांध्यावर जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. कृषीमंत्री दिसले का? महिलांना शिवीगाळ केली. हे ह्यांचे हिंदुत्व. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या त्यावर कृषीमंत्री अपमानास्पद वक्तव्य करतात. केंद्रीय कृषीमंत्री काहीच करत नाही. मविआने अवकाळी पाऊस झाल्यावर तात्काळ मदत केली. सत्ता गेल्याचे दुख नाही पण चांगले काम करणारे सरकार गद्दारी करुन पाडले. खंडोजी खोपड्यांची औलाद. गद्दारांना हातात भगवा घेण्याचा अधिकार नाही. तुमची ओळख गद्दारच राहणार.”

Novel NIBR Ads

“उद्योग सावरावा तेव्हा मविआने वीज दरात सवलत. वस्त्रोद्योग कार्यालय दिल्लीला हलवले. सगळ्यांना मुंबई जवळ होत पण मिंधे चुप बसले. उपमुख्यमंत्री म्हणतात कार्यालय नाही नेले आयुक्त फक्त गेले मग आयुक्त काय फुटपाथवर बसणार आहेत का? मुंबईचे महत्व मारायचे हे कुठले सरकार. निवडणुक आयोगाचा गांडुळ झालय. खेड आजची सभा बघितली तर कळेल शिवसेना कुठली. लाखोंच्या संख्येने आपण प्रतिज्ञापत्र दिली ती रद्दी ठेवायला जागा नव्हती म्हणून नाही दिली. होय ही शिवसेना माझ्या वडिलांनी निर्माण केली मिंध्यांची नाही.”

हेही वाचा – ‘सावरकरांचा अपमान सहन करणार नाही’, उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना जाहीरपणे ठणकावलं

#शिवगर्जना । पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा । एम. एस. जी. कॉलेज ग्राऊंड, मालेगाव, नाशिक – #LIVE

????आता जिंकेपर्यंत लढायचं !!#UddhavThackeray #निष्ठावंतांचामहासागर #आपलेसाहेब #कुटुंबप्रमुख

रविवार : २६ मार्च २०२३ https://t.co/s4cgv8chwZ

— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 26, 2023

“लोकशाहीचे भवित्व्य वाईट आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील म्हणाले हे सत्तांतर दगड ठेवून घेतलय. आताचे बावनकुळे म्हणतात आम्ही मिंधे गटाला ४८ जागाच देणार. बावनकुळेंनी नावाप्रमाणे तरी जागा द्यावी. भाजपने जाहीर करावे मिंधेंना नेते म्हणून निवडणुक लढणार का? तुमची ५२ काय १५२ कुळ आली तरी ठाकरेंपासून तुम्ही दूर नेऊ शकत नाही. तुम्ही मोदींच्या नावाने निवडणुक लढवा मी माझ्या वडिलांच्या नावाने लढतो पण निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा.”

“भाजपने कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत आरोप केलेल्या विरोधी पक्षातील लोकांना पक्षात घेतलय. परवाच भाजप आमदार वाॅशिंग पावडर बद्दल बोलला. बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष. भाजपातील काही स्वच्छ माणसं कस हे सहन करतात. चारित्र्यहनन करणे, बदनामी करणे. मोदी म्हणजे भारत नाही. तुमच्या कुटुंबीयांबद्दल काही बोलले तर पोलीस घरात घुसतात. आमचे संस्कार म्हणून आम्ही तुमच्या कुटुंबावर आरोप करत नाही.”

“एक तरी अशी घटना दाखवा मुख्यमंत्री झाल्यावर मी हिंदुत्व सोडले. जे माझे आजोबा वडील बोलायचे शेंडी जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. अनिल देशमुखांच्या नातीची चौकशी, लालूप्रसाद यादवांच्या सुनेची बेशुद्ध होईस्तोवर चौकशी. हे तुमचे हिंदुत्व. आता उघडपणे बोलतात आम्हाला शांत झोप लागते हर्षवर्धन पाटील म्हणाले. गुजरातला आधी का गेले हे आता समजले काय धुतले माहिती नाही.”

“काल राहुल गांधींची पत्रकार परिषद. हिडनबर्गने घोटाळे काढले पण त्याकडे लक्ष नाही. राहुल गांधींना जाहीर सांगतो सावरकर आमचे दैवत त्यांचा अपमान आम्हाला पटणार नाही. सावरकर काय होते हे आपण वाचू शकतो. अष्टभुजेसमोर शपथ घेणारे सावरकर. १५ व्या वर्षी ही सावरकरांची शपथ. सावरकरांनी जे केले ते कोणाचेही काम नाही १४ वर्ष छळ सोसला ते बलिदानच. म्हणून राहुल गांधींना सांगतोय आपण लोकशाही वाचवायला आलोय.आता जर वेळ चुकली तर मग पुढे कठीण आहे. पुन्हा जर हे तिथे बसले की मग लोकशाही संपली. ही लढाई मी मुख्यमंत्री होण्याची नाही लोकशाही वाचवण्याची आहे. भाजप मधील सावरकर भक्त आहात तर अंध भक्त होऊ नका.”

“१५ दिवसांपूर्वी संजय कदम, अद्वय आले हे सभा सभारंभ पुरता असू नये. ही लढाई देशाची, शेतकऱ्यांची आहे. तुमची मला आवश्यकता आहे. श्रीकृष्णाने जसा गोवर्धन उचलला तसा लोकांनी पण हातभार लावला तसा तुम्ही पण हातभार लावा. रावण धनुष्य घेतांना उताणा पडला तिथे हे मिंधे कोण? मी तुमच्या सोबतीने लढायला उभा आहे.” ( Full Speech of Shiv Sena Uddhav Thackeray In Malegaon Sabha Rally In Nashik )

अधिक वाचा –

– राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्गच्या खेळाडूंना घवघवीत यश; तपस्या मतेला ‘स्ट्राँग वुमेन ऑफ महाराष्ट्र’ अवॉर्ड
– अपघात ब्रेकिंग! द्रुतगती मार्गावर सोमाटणे फाट्याजवळ साखरेची पोती वाहून नेणारा ट्रक उलटला


dainik maval jahirat

Previous Post

‘सावरकरांचा अपमान सहन करणार नाही’, उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना जाहीरपणे ठणकावलं

Next Post

किरकोळ कारणावरून रिक्षा चालकाची दुचाकी चालक तरुणाला जमाव करुन बेदम मारहाण

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

किरकोळ कारणावरून रिक्षा चालकाची दुचाकी चालक तरुणाला जमाव करुन बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.