Dainik Maval News : गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी विसर्जन मिरवणुकीदरम्यान सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक वाजवल्याप्रकरणी शिरगाव-परंदवडी पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याबद्दल दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, लाऊडस्पीकरसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी गणेश मंडळांचे पदाधिकारी व डीजे चालकांची बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याचे लेखी निर्देश दिले होते. तरी देखील २० सप्टेंबर रोजी सातव्या दिवसाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान चांदखेड आणि ओझर्डे येथील दोन मंडळांनी मर्यादेपेक्षा जास्त आवाजात ध्वनीक्षेपकांचा वापर करून आदेशाचे उल्लंघन केले. या दोन्ही मंडळांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी आठ साऊंड सिस्टीम स्पीकर, दोन डीजे मिक्सर, दोन ॲम्प्लिफायर मशीन, एक वाहन जप्त केले आहे.
गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणत्याही गणेश मंडळाने उच्च आवाजाचे डीजे किंवा ध्वनी प्रदूषण करणाऱ्या साधनांचा वापर करू नये. नियमांचे उल्लंघन केल्यास पूर्वसूचना न देता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल व साहित्य जप्त केले जाईल, याची संपूर्ण जबाबदारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची असेल, असा इशारा पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोउपनि नाईद शेख, अशोक केंद्रे, महेंद्र सपकाळ, पोलीस कॉन्स्टेबल दिनकर भुजबळ, प्रशांत भोसले, दत्तप्रसाद चौधरी, रितेश कोळी, काजल आघाव, सुरेश परदेशी, संतोष तांबे, सागर कोळी, लक्ष्मण हेमाडे यांच्या पथकाने केली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप
– पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप
– टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी
– ‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
