सध्या किरकोळ कारणावरुन मारहाण आणि गंभीर गुन्हे होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या दिसत आहे. देहूगाव इथे एका किरकोळ कारणातून दुचाकी चालकाला जमाव करुन बेदम मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कृष्णा राजाराम शिंदे (वय 22 वर्षे, व्या. गॅरेज मॅकेनीक, रा. चव्हाणनगर, तळवडे गावठाण ता. हवेली जि. पुणे) याने याप्रकरणी देहूरोड पोलिसांत फिर्याद दिली आहे. दिनांक २४ मार्च रोजी भैरवनाथ चौक देहुगांव येथे हि घटना घडली. त्यानुसार एकूण सहा आरोपींवर देहुरोड पोलिस ठाण्यात भा.द.वि कलम ३२६,३२५, ३४१, ५०४, १४१,१४३, १४६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी क्रमांक 1) श्रीराम देशमुख (वय अंदाजे ३० ते ३२ वर्षे) २) राम भासले, ३) रोहीत वाघ, ४) विष्णु वाघ, ५) विजय सुर्वे, ६) रिक्षा चालक श्रीराम याची पत्नी (नाव पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ( Two Wheeler Driver Was Brutally Beaten Up By Mob Of Auto Rickshaw Driver For Minor Reason )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा हे त्यांच्या काकाचे घरुन त्याच्या मामाचे घरी भंडारा डोंगराकडे जात असतांना फिर्यादी हे भैरवनाथ चौक देहुगांव येथे आले असता फिर्यादीच्या मोटार सायकलचा (आरोपी क्रमांक १) श्रीराम देशमुख यांच्या रिक्षाला धक्का लागला. या कारणावरून त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करुन हाताने आणि लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच आरोपी क्र २ ते ६ यांनी देखील फिर्यादी यांना लाथाबुक्याने मारहाण केली.
श्रीराम यांनी बांबुचे काठीने फिर्यादीच्या पाठीत मारहाण केली, त्यावेळी फिर्यादी यांनी तेथून निघुन जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपी क्र १ ते ६ यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी यांचा अटकाव केला आणि त्या सर्वांनी फिर्यादी यांना माराहण केल्याने त्याच्या पोटामध्ये रक्तस्त्राव होऊन फिर्यादी कृष्णा शिंदे यांना गंभीर जखम झाली असल्याचे फिर्यादी नमूद आहे. सपोनि गायकवाड हे या प्रकऱणाचा पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्गच्या खेळाडूंना घवघवीत यश; तपस्या मतेला ‘स्ट्राँग वुमेन ऑफ महाराष्ट्र’ अवॉर्ड
– अपघात ब्रेकिंग! द्रुतगती मार्गावर सोमाटणे फाट्याजवळ साखरेची पोती वाहून नेणारा ट्रक उलटला