गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दिनांक २५ मार्च रोजी केलेल्या कारवाईत तळेगाव दाभाडे शहरात अवैध गुटख्यावर कारवाई करुन तब्बल ७,५४,५५४ रुपये किंमतीच्या मुद्देमालासह २ आरोपींना अटक करण्यात आली. ( Gutkha And Tobacco Products Seized In Talegaon Dabhade City Two Accused Arrested With Material )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने दिनांक २४ मार्च २०२३ रोजी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचे अधिपत्याखाली सहा पोलीस निरीक्षक उध्दव खाडे हे स्टाफसह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढण्याकरीता तळेगाव दाभाडे भागात पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, राखाडी रंगाची इको गाडी (गाडी क्रमांक MH- 14/EY/3668 ) ही गाडी कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे इथे रात्री उशीरा येणार आहे. या गाडीत प्रतिबंधित गुटखा सदृश्य पदार्थाचा साठा विक्री करीता आणणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. ( Pimpri Chinchwad Commissionerate Crime Branch Anti Extortion Squad )
त्यामुळे सपोनि उध्दव खाडे यांनी सोबत असलेल्या स्टाफला ब्रीफ करुन कडोलकर कॉलनी येथील लायन्स क्लब जवळ सापळा लावुन दिनांक २५ मार्च २०२३ रोजी रात्री दीडच्या सुमारास इको कार ( क्रमांक MH – 14/EY / 3668 ) मधून निहार गोपाल विश्वास (वय ५१ वर्षे रा. म्हस्करनेस कॉलनी, तळेगाव दाभाडे ता.मावळ जि.पुणे) असे सांगुन त्याचे सोबत असलेला इसम हा त्याचा कामगार असून त्याचे नाव अविजीत रणजीत बाच्छार (वय २६ वर्षे) यांना शिताफीने ताब्यात घेतले. तसेच इको कारची पाहणी केली असता, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला, तंबाखुजन्य पदार्थ या असुरक्षित आरोग्यास घातक/ अपायकारक असा २,९४,५५४रुपये किंमतीचा गुटखा मिळुन आला. तसेच इको कार, २ मोबाईल व २,९४,५५४ रुपयेचा गुटखा, पान मसाला, तंबाखुजन्य पदार्थ असा एकुण ७,५४,५५४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यांच्याविरुध्द तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि. कलम ३२८, २७२, २७३,१८८, ३४ सह अन्न आणि सुरक्षा मानके कायदा कलम ३० (२) (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Gutkha And Tobacco Products Seized In Talegaon Dabhade City Two Accused Arrested With Material )
हेही वाचा – किरकोळ कारणावरून रिक्षा चालकाची दुचाकी चालक तरुणाला जमाव करुन बेदम मारहाण
सदरची कारवाई विनय कुमार चौबे (पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड) मनोज लोहीया (सह पोलीस आयुक्त) डॉ. संजय शिंदे (अपर पोलीस आयुक्त) स्वप्ना गोरे (पोलीस उप-आयुक्त, गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर (सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पो.उप निरी. अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, सुधीर डोळस यांचे पथकाने केली आहे.
अधिक वाचा –
– अपघात ब्रेकिंग! द्रुतगती मार्गावर सोमाटणे फाट्याजवळ साखरेची पोती वाहून नेणारा ट्रक उलटला
– ओवळे गावातील श्री म्हसोबा देवस्थान मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न