व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 4, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ आणि तळेगाव दाभाडे येथे दोन कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन । Maval News

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास निधीतून मावळ तालुक्यात विकास कामांचा धडाका सुरु आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 4, 2025
in ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Bhumi Pujan for development works worth Rs 2 crores at Vadgaon Maval Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास निधीतून मावळ तालुक्यात विकास कामांचा धडाका सुरु आहे. वडगाव आणि तळेगाव दाभाडे मध्ये दोन कोटी दहा लाख रुपयांच्या कामांचे भूमीपूजन खासदार बारणे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

आमदार सुनील शेळके, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाऊ खांडभोर, शिवसेना महिला जिल्हा संघटिका शिलाताई भोंडवे,विशाल हुलावळे, शिवसेना तालुका प्रमुख राम सावंत, शिवसेना शहर प्रमुख देवा खरटमल, युवासेना मावळ तालुका प्रमुख राजेश वाघोले, दिपक हुलावळे, माजी नगरसेवक निखिल भगत, कल्पेश भगत, शिवसेना महिला तळेगाव शहर संघटीका विनाताई कामत, सुरेश जेंड उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे यशवंतनगर येथील गोळवलकर गुरूजी मैदान व उद्यान सुशोभीकरणाची मागणी केली जात होती. त्यासाठी खासदार बारणे यांनी विशेष निधीतून ५० लाख रुपयांच्या निधी दिला आहे. त्यासह इतर विकासकामांसाठी ५० लाख अशी एक कोटी रुपयांच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर वडगाव येथे एक कोटी दहा लाख रुपयांच्या कामांचेही भूमीपूजन खासदार बारणे यांच्या हस्ते झाले.

वडगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी डॉ. प्रविन निकम, भाजप मावळ तालुका प्रभारी भास्करराव म्हाळस्कर, पोटोबा देवस्थान समितीचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, गणेश ढोरे, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता धनराज दराडे, माजी सभापती गुलाबकाका म्हाळस्कर, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, शिवसेना तालुका प्रमुख राम सावंत, युवासेना मावळ तालुका प्रमुख राजेश वाघोले, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, माजी नगरसेवक सुनील ढोरे, प्रविण चव्हाण, नवनाथ हारपुडे, प्रविण ढोरे, शेखर भोसले, संभाजी म्हाळस्कर, रुपेश म्हाळस्कर, खंडू भिलारे, पंढरीनाथ ढोरे, किरण म्हाळस्कर, सुभाष जाधव उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मावळ विधानसभेतील जनतेने तिन्ही निवडणुकीत मला साथ दिली. मताधिक्य दिले. त्यामुळे यातून उतराई होण्यासाठी सर्वाधिक निधी मावळला दिला आहे. मावळमधी वाड्या, वस्त्यांमधील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. अंतर्गत रस्ते, मैदाने, उद्यान विकसित केली आहेत. केंद्रात, राज्यात महायुतीचे सरकार आहे. तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल.

देहूरोड वायजंक्शन ते वाकडपर्यंतच्या रस्त्याला गती मिळाली आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत रेल्वे स्थानके अत्याधुनिक केली आहेत. लोणावळा ते पुणे तिसऱ्या, चौथ्या ट्रॅकच्या कामाबाबत सरकार सकारात्मक आहे. राज्य शासनाने त्यांचा हिस्सा देण्यासाठी नुकतीच मान्यता दिली आहे. विकास कामे करण्यासाठी राज्य सरकार ठाम आहे. विकास कामांमध्ये कोणाीही राजकारण आणू नये, सर्वांनी एकत्रित येऊन विकास कामे करुयात.

आमदार सुनील शेळके म्हणाले, खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून मावळ विधानसभेत मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून चांगली विकास कामे करत आहोत. भविष्यातही प्रलंबित कामे मार्गी लावली जातील. विकासासाठी सदैव एकत्रितपणे काम केले जाईल.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल 


dainik maval jahirat

Previous Post

‘आधी तोरण राजांच्या गडाला, मग माझ्या दाराला’ ; तिकोणा किल्ल्यावर विजयादशमी उत्साहात साजरी । Tikona Fort

Next Post

अखेर बिगुल वाजले ! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra State Election Commission

अखेर बिगुल वाजले ! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ई-केवायसी करताना ओटीपी येत नाही? ही बातमी वाचा

October 4, 2025
Central government issues new guidelines on use of cough syrup for children Read in detail

लहान मुलांसाठी कफ सिरपच्या वापरासंबंधी केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी – वाचा सविस्तर

October 4, 2025
Crime

अंमली पदार्थ विक्री प्रकरणी आंबी येथून तरूणाला अटक । Talegaon MIDC Police

October 4, 2025
land of temple

देवस्थानच्या शेतजमिनी हडप करणाऱ्यांचा खेळ खल्लास ! सरकारचा मोठा निर्णय

October 4, 2025
Former Zilla Parishad member Nitin Marathe in trouble case registered for threatening a youth shirgaon police

निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्याचा प्रयत्न ; युवकाला धमकावल्याप्रकरणी दाखल तक्रारीवर नितीन मराठे यांची प्रतिक्रिया

October 4, 2025
State-Election-Commission-Maharashtra

मोठी बातमी ! नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

October 4, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.