राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या समितीने नामंजूर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करताना अध्यक्षांच्या निवडीसाठी शरद पवार यांनी समितीची घोषणा केली होती. या समिती सदस्यांची शुक्रवारी म्हणजेच 5 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक पार पडली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या समितीने नामंजूर केला आहे. हा निर्णय पवारांना कळवण्यात येणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘यापुढे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर जड वाहने, पर्यटन गाड्यांना लेन कटिंग करु देवू नका’ – खासदार बारणे
– बाळा भेगडेंसह मावळ तालुक्यातील ‘या’ दोन भाजपा पदाधिकाऱ्यांचीही प्रदेश कार्यकारिणीत निवड