वडगाव मावळ : दिनांक 15 ऑक्टोबर रोजी वडगावमधील निसर्ग वाटिका सोसायटी मध्ये एक मोठी घोरपड आढळून आली होती. तेथील नागरिकांनी लगेचच याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला दिली. संस्थेचे सदस्य जिगर सोलंकी आणि रोहित पवार यांनी वेळ न दवडता सदर ठिकाणी धाव घेतली.
तेव्हा ती घोरपड सोसायटीच्या पायऱ्यांखाली बसल्याची दिसून आली. जिगर सोलंकी यांनी त्या घोरपडीला सुरक्षितरित्या पकडले आणि प्राथमिक तपासणी केली. तेव्हा तिला कोणतीही जखम दिसून आली नाही. त्यानंतर उपस्थित नागरिकांमध्ये घोरपडीविषयी जनजागृती करण्यात आली. त्यानंतर वनविभागाला याची माहिती कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली घोरपडीला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास जवळपासच्या प्राणीमित्रांना किंवा वनविभागला संपर्क (1926) करावा’ असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले आहे. ( Big Ghorpad Bengal Monitor Life Saved At Vadgaon Maval )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान 10 दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंद, वाचा संपूर्ण आदेश
– राज्यात 8 महिन्यात 29 हजार 807 महिला-मुली हरवल्याच्या तक्रारी; 5 हजार 495 अपहरण झालेल्या मुलींचा शोध घेण्यात यश
– पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवा; खासदार बारणेंचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश