व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना फुल उत्पादक संघाच्या वतीने येळसे गावात तयार झालेली अत्याधुनिक रोपवाटिका आदर्शवत – माजी मंत्री बाळा भेगडे

पवनानगर परिसरातील येळसे (ता. मावळ) येथे पवना फुल उत्पादक संघाच्या वतीने 5 एकर क्षेत्रात 'साई रोझेस नर्सरी' ही अत्याधुनिक पद्धतीने गुलाब फुलांची रोपवाटिका तयार करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 15, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
nursery-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवनानगर : पवना फुल उत्पादक संघाच्या वतीने उभारण्यात आलेली अत्याधुनिक व तंत्रज्ञानयुक्त तसेच निर्यातक्षम गुलाब फुलांची रोपवाटिका ही आदर्शवत असून तालुक्यातील सर्व तरुण शेतकऱ्यांनी याचा आदर्श घेऊन अत्याधुनिक शेती पद्धतीत तालुक्याचे नावलौकिक करावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले. ( state of the art plant nursery in Yelse village near Pavananagar )

पवनानगर परिसरातील येळसे (ता. मावळ) येथे पवना फुल उत्पादक संघाच्या वतीने 5 एकर क्षेत्रात ‘साई रोझेस नर्सरी’ ही अत्याधुनिक पद्धतीने गुलाब फुलांची रोपवाटिका तयार करण्यात आली. या रोपवाटिकेची माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी ते बोलत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

याप्रसंगी भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, लोहगड विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन गणेश धानिवले, मावळ पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी संताजी जाधव, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष नारायण ठाकर, भाजपा माजी तालुका सरचिटणीस संदीप भुतडा, सूर्यकांत सोरटे, विठ्ठल शेंडगे, भाजपा काले-चांदखेड गटाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आडकर, पत्रकार ज्ञानेश्वर ठाकर, येळसे गावच्या माजी सरपंच सीमाताई ठाकर, साई रोझेस कंपनीचे संचालक प्रदीप ठाकर, यांसह पवना फुल उत्पादक संघाचे सर्व संचालक व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मावळ तालुका हा देशातील सर्वात जास्त गुलाब फुलांचे उत्पादन घेणारा तालुका आहे. परंतु त्यासाठी लागणारी रोपे (वान) हे परराज्यातून आणावी लागत होती. यामध्ये अनेक अडचणींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत होता. जसे की दर्जेदार रोपे न मिळणे, वेळेत न मिळणे, अनेकवेळा आर्थिक व्यवहारातून देखील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक व्हायची, पिळवणूक व्हायची, त्यामुळे मावळ तालुक्यातच अत्याधुनिक रोपवाटिका सुरु करण्याचा निर्णय पवना फुल उत्पादक संघाने घेतला. सुरुवातील 10 गुंठ्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही रोपवाटिका सुरू करण्यात आली. त्यानंतर त्यात अभ्यास करून हळूहळू जम बसवला.

  • रोपाच्या दर्जावर सर्वात मोठे काम केले. त्यामुळे बाजरात नाव टिकून राहिले आणि त्याचेच फलित म्हणून गेल्या तीन वर्षात या व्यवसायाचे वटवृक्षात रूपांतर होऊन आता हे क्षेत्र पाच एकरवर गेले आहे. त्यामुळे वर्षभरात साधारण 50 ते 55 लाख रोपे तयार होतील अशा क्षमतेची सुसज्ज स्वयंचलित नर्सरी अत्याधुनिक शेती पद्धतीत तालुक्याचे नावलौकिक करत आहे. याच नर्सरीद्वारे मावळातील सर्व शेतकऱ्यांची गरज भागवून राज्य व देशभरात झाडे निर्यात केली जातात. विविध प्रयोगांतून काळजीपूर्वक झाडाची गुणवत्ता जपल्यामुळे परदेशातून देखील मोठ्या प्रमाणात येथील झाडांना मागणी आहे. पूर्वी परराज्यातून झाडे घेताना फसवणूक होऊन हताश झालेले शेतकरी आता मावळ तालुक्यातच झाडे उपलब्ध होत असल्याने आता समाधानी दिसत आहेत.

‘साई रोझेस नर्सरी’ या अत्याधुनिक व स्वयंचलित नर्सरीमध्ये सद्यस्थितीला 14 प्रकारची (रंगांच्या) रोपे तयार केली जातात. यामुळे जवळजवळ 60 लोकांना रोजगार उपलब्ध झाला. सुरुवातीपासूनच चांगल्या दर्जाची रोपे तयार करून त्याची विक्री केल्याने शेतकऱ्यांची मने जिंकता आली. यामधूनच व्यवसायात आर्थिक भरभराट आली. यावर्षी 2 एकर क्षेत्र वाढविल्याने आणखी काही रंगांच्या (जातीच्या) झाडांचे उत्पादन घेता येईल. – मुकुंद ठाकर (उद्योजक, साई रोझेस नर्सरी)

अधिक वाचा –
– राज्यात 8 महिन्यात 29 हजार 807 महिला-मुली हरवल्याच्या तक्रारी; 5 हजार 495 अपहरण झालेल्या मुलींचा शोध घेण्यात यश
– पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवा; खासदार बारणेंचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
– मोठी बातमी! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान 10 दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंद, वाचा संपूर्ण आदेश


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील मुलींसाठीचे एकमेव महाविद्यालय सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाला ‘नॅक’कडून ‘बी’ ग्रेड मानाकंन

Next Post

स्थानिकांची हुशारी आणि प्राणीमित्रांच्या प्रयत्नांमुळे घोरपडीला जीवनदान । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bengal-Monitor-Life-Saved

स्थानिकांची हुशारी आणि प्राणीमित्रांच्या प्रयत्नांमुळे घोरपडीला जीवनदान । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
Pune Zilla Parishad

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर

October 24, 2026
30-foot-tall saffron flag has been hoisted on Tikona fort in Pavan Maval region

पवन मावळातील किल्ले तिकोणा गडावर ३० फूट उंच भगवा ध्वजाची उभारणी

October 24, 2026
Khel Rangla Paithanicha event organized at Shri Marimata Temple Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : श्री मरिमाता मंदिर येथे “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन

October 23, 2026
Prompt action by Kamshet police Four missing minors located within just three hours Maval Crime

कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन

October 23, 2026
Water-shut-off

वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय

October 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.