Dainik Maval News : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील कृषी सहाय्यक म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करणारा कर्मचारी, परंतु गेली काही दिवसांपासून राज्यभरातील कृषी सहाय्यक त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेले होते. दरम्यान मंगळवारी झालेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत कृषी सहाय्यकांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या असून त्यामुळे संप माग घेण्यात आल्या आहेत.
कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलले
राज्यातील कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांच्या पदनामात अनुक्रमे ‘उप कृषि अधिकारी’ व ‘सहाय्यक कृषि अधिकारी’ असा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय केवळ पदनाम बदलण्याबाबत पुरता मर्यादित राहील. वेतनश्रेणी, वेतनस्तर, सेवाप्रवेश नियम आदींमध्ये कुठलाही बदल केलेला नाही.
इतरही मागण्या मान्य
कृषि सेवक तीन वर्षांचा कालावधी रद्द करणे, ऑनलाइन कामे करण्यासाठी लॅपटॉप मिळावा, कृषि सहाय्यक पदनाम बदलून सहाय्यक कृषि अधिकारी करणे, ग्रामस्तरावर मदतनीस मिळणे, निविष्टा वाटपाचे मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही व्हावी, नैसर्गिक आपत्ती पंचनाम्याची कार्यपद्धती तयार करण्यात यावी, आकृतिबंध तात्काळ मंजूर करण्यात यावा या मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संपावर गेले होते.
यापैकी पदनाम बदल झाला असून त्याचा शासन निर्णय लवकरच काढण्यात येईल. तर लॅपटॉप मिळण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून उर्वरित मागण्याही प्रक्रियेत असल्याने संप मागे घेण्यात आला असल्याचे आणि आजपासून (दि. २८ मे) सर्व अधिकारी कर्तव्यावर हजर होत असल्याचे, विकास गोसावी,जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना शाखा पुणे यांनी सांगितले.
राज्यातील कृषी सहायकांचे गेल्या २२ दिवसांपासून सुरू असलेले असहकार आंदोलन अखेर प्रमुख मागण्या मान्य झाल्यानंतर स्थगित करण्यात आले आहे. कृषी सहायकांना आता यापुढे सहायक कृषी अधिकारी, तर कृषी पर्यवेक्षकांना उप कृषी अधिकारी, असा पदनामात बदल करण्याचा निर्णय थेट राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. – घनश्याम दरेकर, तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना शाखा मावळ
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन