लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकरल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वेहेरगाव येथे काही जण अवैधरित्या मटका अड्डा चालवत आहेत. त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर आणि रहिवाशांवर वाईट परिणाम होत आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
त्यावरून आयपीएस सत्यासाई कार्तीक यांनी सोमवारी (दिनांक 26) रोजी त्यांच्या डीबी पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले. तेव्हा मौजे वेहेरगाव येथे एका झाडाखाली पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये मटका अड्डा चालविणारा एजंट 1) सिध्दार्थ फकीरराव खरात (वय 4) व त्याठिकाणी कल्याण नावाचा मटका खेळणारे चार व्यक्ती 2) जगन्नाथ किसन मावकर (वय 48) 3) सुनील यादव सूर्यवंशी (वय 47) 4) गोरख रघुनाथ मोहिते (वय 60) 5) विनायक उर्फ विजय दशरथ देवकर (वय 55) असे एकूण पाच जण ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, मटक्याचे साहित्य, ऑटो रिक्षा असा एकूण 1 लाख 10 हजार 210 रूपये (अक्षरी एक लाख दहा हजार दोनशे दहा) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच नमूद मटका अड्डा चालवणाऱ्या एजंटकडे अधिक चौकशी केली असता इसम नामे 1) चंद्रकांत हौजी देवकर, २) शंकर नाना बोरकर, ३) निलेश सहादु बोरकर, ४) संतोष नामदेव बोत्रे सर्व रा.वेहेरगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे हे त्यांचे स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता सदरचा मटका अड्डा चालवत असल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. ( Big News Lonavala rural police raid Matka hideout in Vehergaon case registered against 10 people )
सदरबाबत पो.कॉ गणेश येळवंडे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये एकूण दहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा सागर बनसोडे, पो.हवा अंकुश नायकुडे पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे यांचे पथकाने केली आहे.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात राष्ट्रवादी अजितदादा गटाला मोठा झटका! जुन्या जाणत्या नेत्याचा पक्षाला राम-राम… अनेक गंभीर आरोप
– मावळ खरेदी-विक्री संघावर महायुतीची एकहाती सत्ता! ‘या’ 3 उमेदवारांचा धक्कादायक पराभव, एका क्लिकवर वाचा संपूर्ण निकाल
– कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे; मंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा