व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी अजितदादा गटाला मोठा झटका! जुन्या जाणत्या नेत्याचा पक्षाला राम-राम… अनेक गंभीर आरोप

त्यांनी पदाचा अचानक राजीनामा दिल्याने तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा होत आहे. तालुक्यातील पक्षातील गटबाजीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 26, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Santhosh-Murhe-Resigned-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यात ग्रामीण भागात तळागाळात पोहोचलेले अध्यक्ष असा लौकिक असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (दादा गट) संतोष मुऱ्हे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुऱ्हे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे दिला आहे. संतोष मुऱ्हे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे अनेक चर्चांना तोंड फुटले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

संतोष मुऱ्हे यांनी अचानक पदाचा राजीनामा दिल्याने तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा होत आहे. तालुक्यातील पक्षातील गटबाजीला कंटाळून मुऱ्हे यांनी राजीनामा दिल्याचे गंभीर आरोप होत आहेत. संतोष मुऱ्हे यांनी मावळ तालुक्याचे दोन वेळा युवक अध्यक्ष पद सांभाळले होते. तसेच जिल्हा कार्याध्यक्ष असताना पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी यांचा स्वतंत्र कार्यभार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर सोपवला होता. (Maval taluka NCP Leader Santhosh Murhe Resigned)

  • सोमाटणेचे अध्यक्ष ते पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पदापर्यंत आपल्या कामाने आणि कार्यकर्त्यांप्रती असलेल्या आपुलकीच्या भावनेने संतोष मुऱ्हे पोहोचले होते. मागील लोकसभेच्या निवडणुकीत पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली होती. मावळ तालुक्यातील संतोष भेगडे, संतोष मुऱ्हे, सचिन घोटकुले, सुनील दाभाडे या चौकडीचे नामकरण ‘फोर एस’ असे झाले होते. त्यातील एक S कमी झाल्याने ताकद कमी झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून संतोष मुऱ्हे पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत होते. त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना दोन वेळा पक्षाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मावळ तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी यांचा कार्यभार त्यांनी चांगला सांभाळला होता. हे पाहून 2014 ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेसाठी उमेदवारी दिली होती. परंतू ज्येष्ठ नेते माउली दाभाडे यांच्यासाठी त्यांनी उमेदवारी सोडली आणि पक्षाचे कार्य करीत राहिले. त्यामुळे अशा कार्यकर्त्यासाठी आता अजित दादा काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा –
– महत्वाचे! देहू नगरपंचायतीसाठी 24 कोटी 26 लाखाचा निधी, आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन । MLA Sunil Shelke
– औंध येथील जिल्हा रुग्णालयात पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवीन आयुष रुग्णालयाचे लोकार्पण आणि अतिदक्षता रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन
– पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सोमाटणे गावासाठी मोठा निधी; बाळा भेगडेंच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन 


Previous Post

मावळ खरेदी-विक्री संघावर महायुतीची एकहाती सत्ता! ‘या’ 3 उमेदवारांचा धक्कादायक पराभव, एका क्लिकवर वाचा संपूर्ण निकाल

Next Post

कशाळ येथील साकव पुलाचे ग्रामस्थांच्या हस्ते भूमिपूजन; 42 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार शेळकेंचे मानले आभार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sakav-Bridge-Bhumi-Pujan

कशाळ येथील साकव पुलाचे ग्रामस्थांच्या हस्ते भूमिपूजन; 42 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार शेळकेंचे मानले आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

May 18, 2026
Sant Tukaram Sugar Factory starts using Artificial Intelligence AI and Drone Technology for 2025-26 season

संत तुकाराम साखर कारखान्याकडून २०२५-२६ हंगामासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू

May 18, 2026
Spontaneous response of Vadgaonkar citizens to Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Camp

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास वडगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध दाखल्यांचे वाटप

May 18, 2026
young Girl and Boy studying in Pune drowned in Shirota Dam near Lonavala Maval

पुणे येथे शिक्षण घेणाऱ्या तरूण तरूणीचा लोणावळा जवळील शिरोता धरणामध्ये बुडून मृत्यू

May 18, 2026
House listing and census process begins in Pune district

पुणे जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात

May 17, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajasva Camp held at Talegaon Dabhade Municipal Council

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत ” छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर ” संपन्न

May 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.