तळेगाव एमआयडीसी रोडवरील वडगाव फाटा इथे गतिरोधकावरून दुचाकी स्लीप झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी हा अपघात घडला होता. त्यानंतर उपचारा दरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मयत जयराम केदार सिंह (वय 38 रा. मुळसी, मुळ उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन भरधाव वेगाने जात होता. यावेळी वडगाव फाटा येथे त्याची दुचाकी गतिरोधकावरून घसरून पडली. यात तो गंभीर जखमी झाला व दावाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यावरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ( Bike rider dies in an accident talegaon midc )
अधिक वाचा –
– वाघेश्वर येथील प्राचीन शिवमंदिरात चोरी; संतप्त ग्रामस्थांची वडगाव मावळ पोलिसांत तक्रार
– तळेगाव स्टेशन तलावात तरुण बुडाला; आपदा मित्र आणि अग्निशमन दलाकडून तरुणाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
– जुण्या मुंबई – पुणे महामार्गावर कान्हे फाटा इथे कंटेनरला आग