व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीतील कामांना गती देण्याचे उपवनसंरक्षक यांचे आश्वासन

मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांची वन विभागाच्या पुणे येथील कार्यालयात भेट घेतली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 6, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
maval-Forests

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांची वन विभागाच्या पुणे येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी मावळ तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीतील विकास कामांना गती देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन उपवनसंरक्षक यांनी दिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुका निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. त्याचप्रमाणे वन विभागाच्या जागाही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुख्य रस्ते,अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी, पाणी योजना अशी मुलभुत कामे करताना वनविभागाच्या हद्दीचा किंवा परवानगीचा अडसर येत असतो. त्यामुळे अनेक गावांमधील विकासकामे खोळंबतात. मावळ तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीतील बहुतांश विकासकामे रखडल्याने स्थानिक ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अनुषंगाने आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विकासकामे सुरु असलेल्या काही गावात वन विभागाच्या जागा आहेत. वन विभागाची परवानगी न घेता कामे पूर्ण होणे शक्य नाही. त्‍यामुळे वन विभागाने सहकार्य करुन लवकरात लवकर परवानग्या द्याव्यात, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली. यावर वन विभागाकडुन आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळणार आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी योजनांमधील पाण्याची टाकी, पाईपलाईन वन विभागाच्या हद्दीत येत असतील, तर त्या गावातील ग्रामसभेचा ठराव व मागणी पत्र दिल्यानंतर पुढील कामांना परवानगी देणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तरी ज्या गावांमध्ये या अडचणी असतील त्यांनी पुढील आठ दिवसात संबंधित कामाचे मागणी पत्र व ग्रामसभेचा ठराव तळेगाव दाभाडे येथील जनसंपर्क कार्यालयात देण्याचे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे. ( Assurance of Conservator of Forests to speed up works within forest department limits in Maval )

अधिक वाचा –
– तळेगाव स्टेशन तलावात तरुण बुडाला; आपदा मित्र आणि अग्निशमन दलाकडून तरुणाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
– जुण्या मुंबई – पुणे महामार्गावर कान्हे फाटा इथे कंटेनरला आग
– वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी भाजपा मैदानात; ‘प्रश्न लवकर मार्गी लावा, अन्यथा…’, रविंद्र भेगडेंचा आंदोलनाचा इशारा


Previous Post

भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा शिबीर संपन्न

Next Post

गतिरोधकावरुन दुचाकी स्लीप झाल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident

गतिरोधकावरुन दुचाकी स्लीप झाल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
Draft electoral roll voting list

विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध ! एकूण ८६७ मतदारांचा समावेश

June 3, 2026
Stormy wind and rain image

किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही !

June 3, 2026
Talegaon Dabhade Municipal Council plastic seizure drive 30 kg of plastic seized

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्लॅस्टिक जप्तीची धडक मोहीम; ३० किलो प्लॅस्टिक जप्त

June 3, 2026
Shalini Dahibhate from Bedse gets helping hand from Maval BJP house burnt in fire will be rebuilt

बेडसे येथील शालिनी दहिभाते यांना मावळ भाजपाकडून मदतीचा हात ! आगीत जळालेले घर पुन्हा बांधून देणार

June 3, 2026
Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.