लोणावळा शहराजवळील शिलाटणे फाटा येथे आज, रविवारी (दि. 28) सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. दुचाकीवरून वेगात जात असलेल्या एका बाईक रायडरला पिकअप टेम्पोने धडक दिल्याने सदर अपघात घडला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
हा अपघात इतका भीषण होता की, यात बाईक रायडरच्या दुचाकीचा अगदी चक्काचूर झाला. तसेच भीषण अपघातात बाईक रायडर तरुण जागीच मृत पावला आहे. घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. ( Bike rider killed in accident near Lonavala )
विकेंडच्या दिवशी लोणावळा येथे मुंबई, पुण्याहून अनेक बाईक रायडर येत असतात. त्यांच्या गाड्यांचा वेग देखील जास्त असतो. अतिशय वेगाने हे बाईक रायडर गाड्या पळवत असतात. त्यांच्या दुचाकींचा आवाज ऐकूणही अनेकांना धडकी भरते. त्यामुळे अपघात होत असताना अनेकदा बाईक रायडर देखील वेगावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरतात.
अधिक वाचा –
– दुःखद ! मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आबूराव धनवे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन । NCP Leader Aaburao Dhanve Passed Away
– पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार, सुरक्षेच्या दृष्टीने ‘या’ तीन दिवसांत पॅराग्लायडींग, ड्रोन उडवण्यावर बंदी । Pune News
– चर्चा तर होणारच ! उद्धव ठाकरेंचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी धरले अजितदादांचे पाय, नेमकं काय घडलं? वाचा । Maval Lok Sabha