Dainik Maval News : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. १४) दुपारी चाकण-तळेगाव रोडवर खालूंबरे येथे घडला. गोरक्षनाथ प्रभू चोरघे (वय ४८, रा. शेलू, खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याप्रकरणी काळुराम प्रभू चोरघे (वय ५५) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश प्रल्हाद भवर (वय ३२, रा. अहिल्यानगर) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ गोरक्षनाथ चोरघे हे त्यांच्या दुचाकी (एमएच १४/जेबी ६५०३) वरून येलवाडी येथून एच. पी. चौकाच्या दिशेने जात होते.
खालूंबरे येथे आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला एका टेम्पोने (एमएच १६ सीडी ६४५०) धडक दिली. या अपघातात गोरक्षनाथ यांचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यात ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात ; मावळमधील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत होणार अंमलबजावणी
– ‘नियोजन करून दुपारी दीडची लोकल पुन्हा सुरू’, खासदार श्रीरंग बारणे यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना
– मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
– मोठी बातमी : राज्यातील सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी थांबवावी ; महसूलमंत्र्यांचे आदेश