पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मावळ तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात विकास कामांकरिता निधी मंजूर करण्यात आला आहे.
गुरुवार (19 जानेवारी) रोजी पंचायत समिती मावळ येथे सदर मंजूर विकास कामाच्या संदर्भात सर्व विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीला माजी राज्यमंत्री आणि पुणे जिल्हा नियोजन समितीचे नवनियुक्त सदस्य बाळा भेगडे यांसह इतर मान्यवर उपस्थि होते. ( BJP Bala Bhegde Held Meeting Of Officials Of Various Departments At Panchayat Samiti Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर निधींतून संबंधित विकासकामे लवकर मार्गी लागावीत, राजकारण न करता मंजूर विकास कामे वेळेत पूर्ण करावीत, आदी सुचना बाळा भेगडे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, पंचायत समिती बांधकाम विभाग उपअभियंता, सर्व ग्रामसेवक आदीजण यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– केंद्रातील मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच, शिंदे गटाला तीन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता, बारणेंचं पारडं जड
– स्तुत्य उपक्रम! कल्याणी टेक्नोफोर्ज कंपनीकडून देहू गावातील जिल्हा परिषद शाळेला 7 लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य भेट