व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

माजी मंत्री बाळा भेगडे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड; पाहा नवनियुक्त 20 सदस्यांची संपूर्ण यादी

पुणे जिल्हा नियोजन समितीची यादी मंगळवारी (17 जानेवारी) रोजी जाहीर करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 18, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Bala-Bhegade

Photo : fb / Bala Bhegade


पुणे जिल्हा नियोजन समितीची यादी मंगळवारी (17 जानेवारी) रोजी जाहीर करण्यात आली. यात मावळ तालुक्याचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून त्यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्याच्या नियोजनासाठी विशेष ज्ञान असलेले सदस्यांची निवड कलम 3(3) 4(फ) नुसार करण्यात येते, त्यानुसार बाळा भेगडे यांसह एकूण 14 जणांचा समितीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. ( Shinde Fadnavis Government Appoint 20 People On Pune District Planning Committee )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य सरकारने पुणे जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित सदस्य अशी मिळून एकूण 20 सदस्यांची यादी मंगळवारी (दिनांक 17 जानेवारी) रोजी जाहीर करण्यात आली. या नवनियुक्त 20 सदस्यांमध्ये विधानसभा किंवा विधानपरिषद किंवा संसद सदस्यांमधून निवडण्यात येणाऱ्या दोन, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेल्या 4 असे एकूण 6 नामनिर्देशित तर अन्य 14 विशेष निमंत्रित सदस्य आहेत.

राज्यात जून 2022 अखेरीस नवीन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यामुळे या सरकारने महाविकास आघाडी सरकारने पुणे जिल्हा नियोजन समितीवर केलेल्या नियुक्त्या रद्द केल्या होत्या. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित सदस्यांच्या जागा रिक्त होत्या. अखेरीस आता त्यावर नव्याने सदस्य नियुक्ती करण्यात आली आहे.

नामनिर्देशित 6 सदस्य

आमदार भीमराव तापकीर, आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे महानगरपालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बीडकर

विशेष निमंत्रित 14 सदस्य

भगवान पोखरकर (वराळे, ता. खेड), माजी मंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे (तळेगाव दाभाडे, ता. मावळ), वासुदेव काळे ((दौंड), आशा बुचके (पारुंडे, ता. जुन्नर), राहुल बाबूराव पाचर्णे (बाबुरावनगर, ता. शिरूर), जीवन कोंडे (केळवडे, ता. भोर), पांडुरंग कचरे (काटेवाडी, ता. बारामती), विजय फुगे (भोसरी, ता. हवेली), काळुराम नढे (काळेवाडी, ता. हवेली), प्रवीण काळभोर (कदमवाकवस्ती, ता. हवेली), योगेश टिळेकर (कोंढवा बुद्रूक, पुणे शहर), शरद हुलावळे (कार्ला, ता. मावळ), अलंकार कांचन (उरुळीकांचन, ता. हवेली) आणि अमोल पांगारे (वेळू, ता. भोर)
( Shinde Fadnavis Government Appoint 20 People On Pune District Planning Committee )

अधिक वाचा –

– मोठी बातमी! वंचित बहुजन महिला आघाडीची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी सारिका सिंग, पाहा संपूर्ण यादी
– मोठी बातमी! मावळ विधानसभेच्या मनसे पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर, थेट राज ठाकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान, पाहा संपूर्ण यादी


Previous Post

मोठी बातमी! वंचित बहुजन महिला आघाडीची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी सारिका सिंग, पाहा संपूर्ण यादी

Next Post

दुधिवरे गावात शासकीय योजनांबाबत जनजागृती कार्यक्रम; ग्रामस्थांनी ई-श्रम कार्ड, आभा कार्ड योजनांचा घेतला लाभ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Public-Awareness-Program-About-Government-Schemes

दुधिवरे गावात शासकीय योजनांबाबत जनजागृती कार्यक्रम; ग्रामस्थांनी ई-श्रम कार्ड, आभा कार्ड योजनांचा घेतला लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Friday turned out to be a disaster 4 people drowned in two separate incidents in Maval taluka

शुक्रवार ठरला घातवार ! मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

May 1, 2026
लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

May 1, 2026
Missing Link project will be a boon for Maval Traffic congestion in Lonavala Khandala area will be reduced

मिसिंग लिंक प्रकल्प मावळसाठी ठरणार वरदान ! लोणावळा – खंडाळा भागातील वाहतूक कोंडी कमी होणार

May 1, 2026
Missing Link project on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज ‘महाराष्ट्र दिनी’ होणार लोकार्पण

May 1, 2026
Voter list mapping verification work underway under SIR program in Vadgaon Nagar Panchayat limits

वडगाव नगरपंचायत हद्दीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादी मॅपिंग व पडताळणीचे काम सुरू – नागरिकांना आवाहन

April 30, 2026
Basic training workshop for newly elected Zilla Parishad members concluded

ग्रामविकासामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका महत्त्वाची ; सदस्यांची विकासात्मक दृष्टी देईल ग्रामविकासाला नवी चालना

April 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.