वडगाव मावळ शहरात जनसुविधेच्या नावाखाली नगरपंचायतीने पावसाळ्यापूर्वी बसवलेल्या विद्युत खांबांवर अद्याप विद्युत दिवे बसवण्यात आलेले नाहीत. म्हणून आता तरी दिवे लावा, अशी खोचक मागणी वडगाव शहर भाजपाने निवेदनाद्वारे वडगाव नगरपंचायतीचे सीईओ डॉ. प्रविण निकम यांच्याकडे केली आहे. ( BJP Demand To Vadgaon Nagar Panchayat SEO Set Lights On Street Lights Pole In City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वडगाव शहरातून हायवेलगत जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार च्या दूतर्फा असलेल्या सेवारस्त्यांवर तसेच शहरांतर्गत पंचमुखी मारुती मंदिर ते वडगाव फाटा तसेच गावातlतील काही रस्त्यांवर नगरपंचायतीने माघील 5 ते 6 महिन्यांपुर्वी पथदिव्यांसाठी खांब उभे केले आहेत. परंतू अद्याप त्यावर दिवे लावलेले नाहीत. तसेच गावामध्ये बाजारपेठेतील मुख्य रस्त्याचे काम सुमारे 15 महिन्यांपासून संथ गतीने चालू असल्यामुळे बाजारपेठेतील व्यापारी वर्गासह वडगावकर नागरीकांना नगरपंचायत व पीडब्ल्यूडी यांचे ताळबंद नसल्याने नियोजनाभावे या सर्व गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पहाटे व्यायामासाठी चालणारे जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरदार आणि महिलांना पर्यायी मार्ग म्हणून ‘अंधारयुक्त’ सेवा रस्त्यांचा नाईलाजास्तव वापर करावा लागत आहे. या सर्व गोष्टींची गंभीर दखल घेऊन वडगाव नागरिकांचा अंत न पाहता आता तरी दिवे लावा, असा अशी खोचक मागणी वडगाव भाजपाचे वतीने करण्यात आली आहे.
यावेळी माननीय मुख्याधिकारी यांना निवेदन देताना वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे, मा सभापती गुलाबराव म्हाळसकर, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, संघटन मंत्री किरण भिलारे, मा नगरसेवक ऍड. विजय जाधव, मा नगरसेवक भुषण मुथा, सरचिटणीस कल्पेश भोंडवे, उपाध्यक्ष सचिन कराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज! आता लोणावळ्यासाठी शिवाजीनगरहून 4 लोकल सुटणार, पाहा वेळापत्रक
– सुनिलआण्णा शेळकेंची शिष्ठाई अयशस्वी, राहुल कलाटे यांनी बंडखोरी केलीच, उमेदवारी अर्जही भरला