चर्चेच्या फेऱ्या, शेवटच्या दिवसापर्यंत रखडलेली अधिकृत उमेदवारीची घोषणा, यानंतर आज अखेर मविआकडून चिंचवडसाठी राष्ट्रवादीचे नाना काटे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. पाठोपाठ मोठ्या शक्ती प्रदर्शनासह नाना काटे यांनी अजित पवार आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्जही भरला. मात्र, आता अजित पवार यांच्या डोक्याचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. ( Independent candidature filed by Rahul Kalate for Chinchwad Assembly constituency by-election )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी इच्छुक असणारे राहुल कलाटे यांनी पक्षाचा आणि मविआचा आदेश झुगारुन बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मावळचे आमदार सुनिल शेळके यांसह राष्ट्रवादीचे अन्य नेते यांनी केलेली त्यांची मनधरणी काही यशस्वी होऊ शकलेली नाही, अखेर कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरून सर्वांनाच धक्का दिला आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मविआचा अधिकृत उमेदवार जाहीर, ‘यांना’ मिळाली उमेदवारी
– चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत मोठा ट्विस्ट! शंकर जगताप यांनीही भरला उमेदवारी अर्ज, लगेच वाचा