महाराष्ट्र भाजपा कडून पक्ष संघटन विस्तार व पक्ष बळकटीसाठी विभाग प्रभारी आणि जिल्हा प्रभारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात प्रदेश सरचिटणीस यांना संबंधित विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रदेश उपाध्यक्ष व चिटणीस यांना संघटनात्मक जिल्हा प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे. यात मावळ तालुक्याचे माजी आमदार आणि सध्याचे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे यांच्यावर सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुणे आणि मावळ कुणाकडे?
पुण्यातून शहर भाजपचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांना उपाध्यक्षपदी बढती दिली गेली. त्यानुसार राजेश पांडे यांच्याकडे आता पुणे ग्रामीण आणि पुणे मावळचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर पुणे शहराचे प्रभारी अमर साबळे असतील. वर्षा डहाळे यांच्याकडे पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी गुरुवारी (दिनांक 24 मे) विभाग प्रभारी आणि जिल्हा प्रभारी यांच्या नावांची यादी जाहीर केली, त्यांच्याकडे राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघाची जाबाबदारी देण्यात आली. त्यानुसार मावळचे माजी आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्याकडे सोलापूर शहर, सोलापूर दक्षिण आणि सोलापूर उत्तरची जबाबदारी देण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– जांभूळ गावातील पायाभूत सुविधांचा होणार विकास, विविध विकासकामांचे रविंद्र भेगडेंच्या हस्ते भूमिपूजन
– तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरीही चेक करता येईल बारावीचा निकाल, जाणून घ्या सोपी पद्धत । HSC Result 2023