मावळ तालुक्यातील आढले खुर्द ग्रामपंचायत मधील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये सदस्यपदासाठी झालेल्या पोटनिवडणूकीत भारतीय जनता पार्टीचे महेंद्र भोईर हे प्रचंड मतांनी विजयी झाले आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वॉर्ड क्रमांक 1 मधील या अगोदरचे सदस्य हिरामण येवले यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केल्याने सदर ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. गुरुवार 18 मे रोजी याकरिता मतदानाची प्रक्रिया पार पडली, तर शुक्रवारी (दिनांक 19 मे) वडगाव मावळ इथे मतमोजणी करण्यात आली. यावेळी भाजपाचे महेंद्र भोईर यांना 347 पैकी 204 मते पडली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी नामदेव येवले यांना 142 मते मिळाली. एकूण 61 मतांनी भोईर यांनी येवले यांचा पराभव करत ही निवडणूक जिंकली. ( BJP Mahendra Bhoir won in Adhale Khurd Gram Panchayat by election )
अॅड महेंद्र भोईर हे तालुक्याचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. बाळा भेगडे यांच्या माध्यमातून भोईर यांनी गावात अनेक विकासकामे करत वैयक्तिक लाभाच्या योजना यशस्विरीत्या राबवल्या आहेत. तसेच गावात पंतप्रधान आवास योजनेतून तब्बल 160 घरकुल मंजूर करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे एक जाणीव ठेवत नागरिकांनी महेंद्र भोईर यांना मतदान केल्याचे बोलले जात आहे.
अधिक वाचा –
– अखेर न्याय मिळालाच..! पवना धरणग्रस्तांसाठी आनंदाची बातमी, बाधित शेतकर्यांना प्रत्येकी चार एकर जमीन मिळणार
– मावळ तालुका पुन्हा हादरला! 54 वर्षीय व्यक्तीचा कान्हे गावात निर्घृण खून